II निबंध-लेखमाला II-निबंध क्रमांक-१-माझा भारत देश (भाग-2)

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 05:38:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II निबंध-लेखमाला II
                                    -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, निबंध-लेखमाला सुरु करीत आहे, निबंध-लेखमाला या मथळयI-अंतर्गत, सादर करीत आहे, (निबंध क्रमांक-१), आजच्या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा भारत देश"

निबंध  विषय-----
------------

1) माझा भारत देश (भाग-2)-----
--------------------------

    जरी ब्रिटीशांनी भारताची संपत्ति लुटून नेली, तरी भारतात जन्माला येणाऱ्या प्रखर देश भक्ती असलेल्या वीरांना ते काही करू शकले नाही. भारत भूमी ही वीरांना, साधू संतांना, महान व प्रचंड बुद्धिमान लोकांना जन्माला घालणारी भूमी आहे. भारताने शून्याचा शोध लावला म्हणून जग आज संख्या मोजत आहेत. पूर्वीच्या भारतीयांनी इतिहास, भूगोल शास्त्र, खगोलशास्त्र, गणित, विज्ञान, आयुर्वेद अशा सगळ्या शस्त्रांमध्ये इतर देशांपेक्षा खूप प्रगती केली होती. साऱ्या जगातून भारतात शिकण्यासाठी लोक येत होते. तक्षशीला आणि नालंदा, या विद्यापीठांना आजच्या ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड चे महत्व प्राप्त झाले होते.

     त्याच बुद्धिमत्तेचा वारसा असलेल्या लोकमान्य टिळक, शामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रखर राष्ट्र भक्ती असलेल्या वीरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि इतकी वर्षे वेगवेगळे असलेले भारतातील लोक इंग्रजांशी लढायला एकत्र झाले. तेव्हा आपला देश हा पूर्णपणे खऱ्या अर्थानी अखंड भारत झाला. सगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या लोकांनी खांद्याला खांदा लावून ब्रिटीशांशी स्वातंत्र्य युद्ध केले आणि शेवटी ब्रिटीशांनी हार मानून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला परत केला. ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर 'विविधतेत एकता' ही संकल्पना भारतीय मनात उदयाला आली आणि स्वतंत्र भारतात आपले लोकशाही पद्धतीने राज्य सुरू झाले.

     भारत आणि पाकिस्तानच्या फाळणी मुळे आपल्या देशाचे खूप नुकसान झाले. त्यामुळे सगळ्या देशाने कंबर कसून ह्यातून बाहेर पडायचा संकल्प केला, आणि भारताला पूर्वीचे सुवर्ण युग प्राप्त करून देण्याचा निश्चय केला. विद्वानांची भारतात खाणच आहे; त्यामुळे आपण आता अवकाशयान सोडण्या इतपत प्रगती करू शकलो. डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यापैकीच एक. त्यांच्यामुळे आपण आता अमेरिकेच्या तोडीस तोड खगोलशास्त्रात प्रगती करू शकतो. पुरेसे आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ नसेल तर कुठलाही देश तग धरू शकणार नाही हे ओळखून द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी आधुनिक सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत भारताची प्रगती केली आहे.

    उद्योगांमध्ये सुद्धा टाटा,जिंदाल,अंबानी ह्या सारख्या लोकांनी भारताचे स्थान उंचावर नेऊन ठेवले आहे. 'जय जवान जय किसान' हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे; त्या मुळे शेती उद्योगातही नव नवीन शोध लावून प्रचंड प्रगती झाली आहे. भारतात सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत, पण एकी मात्र अजून दूरच आहे. अजूनही देशामध्ये जाती-धर्मावरून दंगे धोपे चालू आहेत. उत्तरेकडे चीन आणि पाकिस्तान यांच्या एकत्र आक्रमणाची भीती आहे. नक्षलवाद आणि दहशतवादाने देश अजूनही पोखरला गेला आहे. त्या मुळे प्रगतीला खीळ बसत चालली आहे. प्रांतीयवाद सुद्धा जोर धरू लागलेला आहे. ह्या दुहीचा आपण एकदा कटू अनुभव घेतला असून सुद्धा आपल्यामध्ये फरक पडत नाही. सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे गरिबी व बेकारीचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी पण वाढली आहे.

     ह्या सर्व संकटांवर मात करून भारत अजूनही प्रगतीच्या दिशेने जात आहे. नक्कीच भारताचे सुवर्ण युग पुन्हा येण्याची आशा निर्माण झाली आहे. इतकं सर्व काही असूनही माझा देश खरच महान आहे.

            लेखक-अजय  चव्हाण
           ---------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॅम्पस जुगाड.कॉम)
                       --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.