"मनातल्या प्रेमाची कविता " - बघ तिला सांगुन

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 06:18:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "मनातल्या प्रेमाची कविता "
                                   ------------------------                                       
मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया एक, मनातल्या प्रेमाची कविता . या कवितेचे शब्द आहेत-"बघ तिला सांगुन"


बघ तिला सांगुन------

बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले
आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात
पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो
पण धाडस होत नाही
असेच काही 'दुसरी' कडेही होत असेल...
शेवटी तेच शब्द मुके होतात.
आणि म्हणुनच... म्हणुनच म्हणतो
एकदा तरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
"थॅंक्स!" म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदा तरी बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदा तरी बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदा तरी बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदा तरी बघ तिला सांगून !


             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीपोएम एस एस .ब्लॉगस्पॉट.कॉम)
          --------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.

Rohan Rajendra Bhosale

खूप छान कविता आहे. माझं यूट्यूब वर चॅनल आहे. "प्रेम काव्य" नावाने. त्यावर मी माझे आणि बरेच कवी आणि कवियित्री चे कविता व्हिडिओ मार्फत प्रदर्शित करतो त्यांच्या नावासहित. तुम्ही इच्छुक असाल तर मला ७७७७०९२२९७ ह्या नंबर वरती तुमची कविता पाठवू शकता.