"जात्यावरच्या ओव्या" - (ओवी क्रमांक-१)

Started by Atul Kaviraje, September 20, 2021, 07:02:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "जात्यावरच्या ओव्या"
                                  --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आजपासून, "जात्यावरच्या ओव्या", या ओवी मालिके अंतर्गत, ओवी सदर सुरु करीत आहे. ऐकुया तर आजची "ओवी क्रमांक-१" व त्याचे स्पष्टीकरण. 


जात्यावरच्या ओव्या- अहिराणी भाषेतील !-(ओवी क्रमांक-१)--
---------------------------------------------------

     पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय.

                   ==================
                      "सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
                       मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ"
                   ===================


     अर्थ -प्रभाते मनी राम चिंतित जावा... यासारखे श्लोक या अशिक्षित स्रियांनी कसे जाणले असतील बरे? आख्ख्या जगाचा भार वाहणा-या या पृथ्वीमातेवर पहाटेच्या समयी पाय ठेवण्याआधी रामाचे नाव घेउ.


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मिसळपाव.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2021-सोमवार.