"विश्व अल्जाइमर दिवस" - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 21, 2021, 01:02:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "विश्व अल्जाइमर दिवस"
                                         लेख क्रमांक-3
                                  -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०९.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस हा "विश्व अल्जाइमर दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

    आधुनिक शास्त्रज्ञांच्या अनेक संशोधनांचा अभ्यास केल्यावर ह्या श्लोकाचा खरा अर्थ कळतो. स्निग्ध पदार्थांचा उपयोग गर्भावस्थेपासून मेंदूच्या पोषणासाठी कसा होतो ह्या विषयी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. इटलीच्या सेराफिना सल्वाति ह्या शास्त्रज्ञाने मेंदूच्या मायलिन नावाच्या महत्वाच्या आवरणाचा मुख्य घटक स्निग्ध पदार्थ असून त्याचा मेंदूच्या घडण्यामध्ये किती मोलाचा वाटा आहे ह्यावर प्रबंध प्रसिद्ध केला आहे.

     नजीकच्या काळात अमेरिकेत काही विद्वानांनी खोबरेल तेलाचा नियमित वापर अल्झायमर विकारात लाभदायक ठरत असल्याचे संदर्भ प्रकाशित केले आहेत. ह्यातील मुख्य मुद्दा म्हणजे त्यातील स्निग्धता. सर्व स्निग्ध पदार्थांपैकी भारतीय वंशाच्या गाईचे तूप श्रेष्ठ आहे परंतु त्याची उपलब्धी अमेरिकेत नसल्यामुळे अन्य उपलब्ध स्निग्ध द्रव्यांचा वापर करून संशोधनकार्य होत आहे असा माझा रोख आहे.

                          नाकातून औषध देणं-----

     ''नासा हि शिरसोद्वारं...'' म्हणजे नाक हा मेंदूचा दरवाजा आहे असं छोटसं वचन आयुर्वेदात सांगितलं आहे. ह्या विषयी 'विहाई यांग' नावाच्या शास्त्रज्ञांनी एक प्रबंध लिहिला आहे. फ्युचर न्युरोलॉजी नामक अमेरिकन जर्नल मध्ये (२००८,३ (१) १-४) ह्या विषयी विस्ताराने वर्णन आहे. ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या अनेक विकारांसाठी उपयोगी ठरणारा मार्ग म्हणजे नाकातून औषध देणे. नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वेचेतून स्निग्ध पदार्थ जलद गतीने मेंदूकडे पोचवले जातात. तोंडावाटे घेतलेली औषधं ब्लड-ब्रेन-बॅरियर मुळे मेंदूच्या विकारात कुचकामी होतात किंवा फारच अल्पांशाने उपयोगी पडतात. त्यासाठी नाकातून औषध देणे हा सहज, सोपा आणि परिणाम करणारा मार्ग आहे. विहाई यांग यांच्या प्रबंधाचा हा सारांश आहे.

     आयुर्वेदात एक – दोन ओळींच्या श्लोकरूपाने जी माहीती दिली असते ती म्हणजे एखाद्या क्लिष्ट गणिताचं सोपं उत्तर. जगात असंख्य शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात ते उत्तर आयुर्वेदात एक-दोन ओळींच्या श्लोकात दिलेले दिसतात.

             

                    (साभार आणि सौजन्य-डॉ. संतोष जळूकर)
                           (संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2021-मंगळवार.