"विश्व अल्जाइमर दिवस" - लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, September 21, 2021, 01:04:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "विश्व अल्जाइमर दिवस"
                                         लेख क्रमांक-4
                                  -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०९.२०२१-मंगळवार आहे. आजचा दिवस हा "विश्व अल्जाइमर दिवस" या नावानेही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, आणि इतर माहिती.

                          अल्झायमर मध्ये आयुर्वेद :-----

     अल्झायमर डिसीज मधे मेंदूच्या पेशी क्रमाक्रमाने सुकण्याची क्रिया घडते. मेंदूच्या पेशींची रचना भरपूर स्निग्ध पदार्थांच्या संमिश्रणातून झालेली असते. त्यासाठी आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे ''घृत नस्य'' म्हणजे गायीचं तूप ४-६ थेंब नियमितपणे घालण्यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता टाळता येऊ शकेल. इंद्रियांच्या पोषणासाठी तूप नक्कीच उपयोगी होऊ शकेल असा विश्वास आपण बाळगण्यास हरकत नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव, कानात तेल घालून ऐक, तैलबुद्धी हे वाक्यप्रचार प्रचारात आले त्यामागे काहीतरी शास्त्रीय अभ्यास नक्कीच असणार. नाकातून प्रविष्ट केलेलं एक विशिष्ट फ्लूरोसंट औषध NXX-066 हे मेंदूतल्या CSF (सेरिब्रो स्पायनल फ्लुइड) मधे २ मिनिटांच्या आत शोषलं जातं असा अभ्यास स्वीडन मधील शास्त्रज्ञांनी करून त्याविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. EEG म्हणजे मेंदूतील विद्युत यंत्रणेचा वेग तपासण्याची एक यंत्रणा आहे. त्यात P300 नावाची एक रेषा (Wave) ज्ञानेंद्रियांपासून मेंदूपर्यंत संवेदना पोचवण्याची गती मोजण्यासाठी अभ्यासली जाते. स्निग्ध आहार दिल्या नंतर ही गती कशी वाढते ह्या विषयी शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. ओमेगा ३ जातीच्या स्निग्ध आहारामुळे ही गती वाढते असं सिद्ध झालं आहे. ओमेगा ३ हे माशापासून काढलेले तेल आहे. अमेरिकेत दुधापासून दही, त्यातून लोणी काढणे व तूप तयार करणे ही गोष्ट माहिती नसल्यामुळे कादाचित त्या शास्त्रज्ञांनी ओमेगा ३ चा वापर केला असावा. भारतात साजुक तूप तयार करण्याची कला अवगत आहे त्यामुळे माशा पासून काढलेल्या तेलाची आवश्यकता नाही. वजन वाढण्याच्या भीतीने आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी कमी होत चालला आहे हे पण अल्झायमर वाढण्याचे एक कारण असू शकते. आयोवा युनिव्हर्सिटी मधे स्टॅटिन्स वर एक संशोधन प्रसिद्ध झालेले वाचण्यात आले. हजारो केसेस मधे अभ्यास करून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, स्टॅटिन्स (रक्तातील चरबी / कोलेस्टेरॉलवर नियंत्रण राखणारे औषध) मुळे अल्झायमरची शक्यता वाढते. कोलेस्टेरॉल हा यकृतात तयार होणारा घटक मेंदूच्या पोषणासाठी फार महत्वाचा आहे. त्याला प्रतिबंध केल्यामुळे मेंदू शुष्क होऊन त्याची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होत जात असावा असा निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. मुळात कोलेस्टेरॉल हा जर निरुपयोगी घटक असता तर त्याची निर्मितीच केली नसती.

                       तोंडावाटे औषध घेणं?-----

     अल्झायमर विकारात तोंडावाटे औषध घेऊन कितपत फायदा होईल ही शंकाच आहे. ब्राम्ही, शंखपुष्पी, वेखंड, तुळस, केशर अशा अनेक गुणी वनस्पती उपयोगी पडू शकतील पण त्या नाकाच्या मार्गाने दिल्या तर त्यांचा परिणाम नेमक्या ठिकाणी, लवकर आणि अचूक होऊ शकेल. अशा वनस्पतींनी सिद्ध केलेले गाईचे तूप ४-६ थेंब रोज नाकात सोडावे. वयाची पन्नाशी उलटली की ही एक सवयच लावून घ्यायला हवी. ''काही फायदा झाला नाही तरी अपाय तर नक्कीच होणार नाही'' आयुर्वेदावर नितांत श्रद्धा असणाऱ्यांना ह्या वाक्याचा खूप राग येतो. पण अल्झायमर विकाराच्या यातना बघितल्या की, खरेच हे वाक्य आवर्जून म्हणावसं वाटते. कारण रोगाची सुरूवात मेंदूच्या पेशींमधे सुरू झाल्यानंतर १० ते १५ वर्षांनी अल्झायमरची लक्षणं दिसायला सुरूवात होते. तेव्हा उपचार करण्याची वेळ केव्हाच टळून गेलेली असते.

                    (साभार आणि सौजन्य-डॉ. संतोष जळूकर)
                           (संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स .कॉम)
               ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2021-मंगळवार.