मौन माझे ???

Started by Ashok_rokade24, September 22, 2021, 08:42:50 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

मौन माझे नसे भय  कुणाचे  ,
कदर भावनांची मी करतो  ॥

दुखावतील कोणी शब्द हे जहरी ,
काळजी वेदनांची नीत मी वाहतो ॥

ऊधळती कोणी जरी दुषणे किती ,
ओंजळीत सारे जपून मी ठेवीतो ॥

पेरिले जरी शूल वाटेवर किती ,
मार्गात पुष्पांची पेरणी मी करतो ॥

अतिरेक जेंव्हा होईल जखमांचा ,
लढण्यासही नीत सिध्द मी राहतो ॥

सौख्य द्यावे नीत सौख्यच घ्यावे ,
माणूसकी हाच खरा धर्म मानतो ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई.