गर्दी ???

Started by Ashok_rokade24, September 22, 2021, 08:50:48 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

गर्दी जखमांची माझ्या इतूकी जहाली ,
ओळख वेदनांची मी विसरून गेलो ॥

प्रसंग संघर्षाचे न कधीच संपले ,
प्रयत्न लाख केले तरीही मी हरलो ॥

विरोधात उभे राहीले ते माझे होते ,
सुख ज्यांचे मी सदैव पहात राहीलो ॥

पाश निराशेचे सभोवती पसरले ,
आनंद जगण्याचा हरवून बसलो ॥

प्रवास सुखाचा साथीला अनेक होते,
थांब्याला अखेरच्या एकटाच उरलो ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई  .