"२२ सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 22, 2021, 11:00:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२२.०९.२०२१-बुधवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२२ सप्टेंबर – दिनविशेष"
                                     ------------------------

अ) २२ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
   -----------------------------

१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.

१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.

१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

१९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.

१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.

१९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.

१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.

१९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.

२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.

=========================================

ब) २२ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)

१८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.

१८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)

१८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.

१८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.

१८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.

१८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)

१९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)

१९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)

१९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.

१९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.

=========================================

क) २२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.

१५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)

१८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.

१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)

१९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)

१९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)

१९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.

१९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)

१९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)

२००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.

२०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.09.2021-बुधवार.