"२३ सप्टेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, September 23, 2021, 10:57:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२३.०९.२०२१-गुरुवार.जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "२३ सप्टेंबर – दिनविशेष"
                                     ------------------------


अ) २३ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
    ----------------------------

१८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.

१८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.

१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.

१९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.

१९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.

१९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

२००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

=========================================

ब) २३ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
   --------------------------

१९५१: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक, एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक, पी. आर. क्रिष्णा कुमार यांचा जन्म.(निधन: १६ सप्टेंबर २०२०)

१२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

१७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.

१८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)

१९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)

१९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

१९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.

१९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

१९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

१९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)

१९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

१९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

१९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.

१९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.

१९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.

१९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

=========================================

क) २३ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
    --------------------------

१८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९)

१८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००)

१९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६)

१९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८८३)

१९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.

२००४: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९२५)

२०१२: जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.

२०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.09.2021-गुरुवार.