विनोदी-वास्तव-चारोळ्या-"गॅस महागला चूल मांडली,स्वयंपाकघरी चिमण्यांनी गर्दी केली"

Started by Atul Kaviraje, September 24, 2021, 02:19:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                सिलिंडर (गॅस) महागाईवर विनोदी-वास्तव-चारोळ्या
          "गॅस महागला चूल मांडली,स्वयंपाकघरी चिमण्यांनी गर्दी केली"
                                        (भाग-2)
       ----------------------------------------------------------

             
(६)
चूल,चिमणी आगळ्या नात्याने बांधली गेलीत
लाकूड,फुकणी आणि अनेक वस्तू साथीला बसलीत
घराला पूर्णपणे खेडे-घराचे फील येत चाललेय,
आता फक्त गाई,बैल,शेळ्या,कोंबड्यांचे प्रवेश बाकी राहिलेय.

(७)
संग्रहालयात काचेच्या पेटीत बंदोबस्तात ठेवलंय सिलिंडरला
न जाणो पुन्हा भविष्यात येईल पुन्हा कधी उपयोगाला
इतिहासाची होत असते पुनरावृत्ती पुन्हा असे म्हणतात,
तोवर चुलीचेच असेल राज्य,बसेल ती पुढेही भाव खात.

(८)
आधुनिक शहरी मुंबईचा मी आधुनिक शेतकरी आहे
गच्चीवरील वाफ्यात मळा ,फळबागा पिकवितो आहे.
खोलीत बांधावीत दावणीला सारी,पाळीव जनावरे दूध-दुभती,
चूल पेटवून म्हणतेय कारभारीण,आता घरी खरी नांदेल सुख-शांती.

(९)
आतां नाहीं होणार गॅस-गळती, आता नाहीं होणार सिलिंडर-स्फोट
मोजावी नाहीं लागणार सिलींडरपाठी हजाराची  कोरी नोट
लाकूड-फाटा स्वस्त तर या कौन्क्रीटच्या जंगलातही मिळतोय,
झाडांना हुडकून काढण्या मी माझा सारा दिवस घालवतोय.

(१०)
गॅस महागला, चूल मांडली,किचनमध्ये चिमण्यांनी वस्ती केली
गावाकडची माणसे भेट देण्या हळू-हळू येऊ लागली
पहाता-पहाता शहरी-करणाचे गांव-करण होऊ लागले,
जीवन पुन्हा त्याच गर्तेत खोल-खोल जाऊ लागले.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.09.2021-शुक्रवार.