" लेख " - "हेल्मेट का वापरावे"- भाग-१

Started by Atul Kaviraje, September 25, 2021, 07:13:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            " लेख "
                                             भाग-१ 
                                           ---------
   
मित्र/मैत्रिणींनो,

      "हेल्मेट" या विषयावर एक सुंदर लेख वाचूया, आणि  या लेखातील आशय समजून घेऊया. या लेखाचे शीर्षक आहे- "हेल्मेट का वापरावे"

हेल्मेट का वापरावे-----

     एवढ्यात पुन्हा एकदा नगरमध्ये हेल्मेट सक्ती लागू केली. बातमी वाचून जरा बर वाटलं पण रस्त्यावर नेहमीचीच उघडी डोकी दिसली. एक दोन लोकं हेल्मेट घातलेली दिसली पण बाकीचे मस्तपैकी चष्मा लाऊन केस उडवत गाडी चालवताना दिसले. वाटेत कोपऱ्यात ट्राफिक पोलीस आपल दुकान मांडून होता. ही लोकं दिवसभर उभी राहिली तर किती फाईन गोळा होऊ शकतो या कल्पनेने मनात उभारी घेतली.

     हेल्मेट वापरायला लोकांना लाज वाटते, म्हणतात, " इथे तर जायचं आहे. मग कशाला पाहिजे हेल्मेट. " काहींचा गोड गैरसमज आहे कि हेल्मेट हे फक्त लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच वापराव लागतं. हे बर आहे कि बाथरूमला जायला इथल्या इथे देखील गाडी वापरलेली चालते मग हेल्मेट का नाही ?

     आजकाल मावा-गोवा खात गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. हेल्मेट घातलं तर थुंकायचं कसं ? कारण मावा खाण हा त्यांचा जन्मसिद्ध (मुलभूत) हक्क किंवा अधिकार आहे आणि हा अधिकार त्यांनी जोपासलाच पाहिजे,  यासाठी ते हजारदा हेल्मेटचा त्याग करतील. पण आज नवीन डिझाईनचे हेल्मेट बाजारात उपलब्ध आहेत, जे घालून थुंकता ही येऊ शकत, पण मग असं केल्यावर त्यांच्या निधड्या, बिनधास्त आणि स्वयंघोषित नेत्याच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल घाबरट, पोरकट, अशी प्रतिमा तयार होऊ शकते म्हणून गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याचा विचारदेखील  त्यांच्या केसाला धक्का लावत नाही. बुलेट किंवा राजदूत वापरणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर कला चष्मा घालणाऱ्या पुढारी व्यक्तीमत्वांना ट्राफिक पोलिसांनी कधी हटकल तर नवलच ! आणि त्यांना अडवायचं तरी कशाला कारण नियम हे फक्त सर्वसामन्यांसाठीच असतात.

     काहींच्या मते हेल्मेट वापरायला काहीच अडचण नाही पण ते सारख-सारख घालायचं, एखाद्या ठिकाणी उतरल कि पुन्हा काढायचं, गाडीला लौक  करायचं किंवा बरोबर वागवायच यापेक्षा नकोच ना हेल्मेट वापरायला ! आणि हेल्मेट वापरून स्वत:ला गुदमरून घेण्यापेक्षा मोकळ्या हवेत वेगाने गाडी चालवताना श्वासोश्वासाचा  व्यायामही होतो. गाडी चालवताना किती महत्वाचे फोन येतात, आणि आपण हेल्मेट घातल तर ? फोन आल्यावर गाडी साईडला घ्या, हेल्मेट काढा मग फोन (मोबाईल) उचलता येईल. एवढ सगळ कराव लागणार ! कल्पना सुध्दा करवत नाही. यापेक्षा फोन आला कि लावला मोबाईल कानाला यासाठी कशाला गाडी थांबवायला हवी, वेळ नसतो.


         लेखक-अभिजीत हजारे.
        ---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कॉलेज कट्टा.कॉम बेस्ट)
                    ----------------------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.09.2021-शनिवार.