विरहाचा उन्हाळा.

Started by anolakhi, April 02, 2010, 07:56:13 PM

Previous topic - Next topic

anolakhi

विरहाचा उन्हाळा.
उन्हाने आता डोळ्यातील आसव देखील सुखु लागली आहेत,आणि बहुतेक मनात देखील कोरड पडू लागली आहे.
हा उन्हाळा त्या विरहाच्या ज्वालाग्नी पेक्षा तरीही बरा, कारण उन्हात चालताना पायात रेंगाळणारी सावली कोणाची तरी आठवण करून देते.
तेव्हा आलेली ती आठवण जणू भर उन्हात झाडांच्या थंड सावलीत चालल्या सारखे भासवते.आणि एखादी आठवण तर नदीवरून सोबत ओलावा घेऊन आलेल्या थंड हवेच्या झुळूकासम असते.
दिवसा उन्हाने अंगाची काहिली होते,तर सांज होता-होता सूर्य मावळनिला लागतो,आणि देऊन जातो आठवणींचा उन्हाळा, ह्या आठवणीच्या उन्हात मात्र कशी थुक नाही पण कोठे तरी पाझर फुटतो,घाम नाही येत,पण कोरडे पडत चाललेले डोळे पाझरतात,हात डोळे पुसाया साठी सरसावतात  ,पण हाताला पुन्हा कोरडच नशिबी येते,कोरड "विरहाची".
उन्हाळ्यात  जशी जमीन सुकून पार भेगा पडतात,तसेच आता मनाला भेगा पडायची वेळ आली आहे आताशा.
धरणीला जशी पावसाची आशा लागली असते,तशीच काहीशी आशा मनाला आपुलकीची,प्रेमाची लागली असते...
पण हा तर चकव्याचा रस्ता पुन्हा एका कोरड्या वाटेत सोडून देतो,कारण पाउस पडला तरी उन्हाळा पण परत येतोच,....विरह पुन्हा येतोच....सोबत पावसाची,आपुलकीची,प्रेमाची आठवण घेऊन येतो...

अनोळखी(निलेश)

santoshi.world

hya lines khup avadlya  :)  ....

gaurig