“जागतिक पर्यटन दिन” - लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, September 27, 2021, 02:20:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "जागतिक पर्यटन दिन"
                                          लेख क्रमांक-१
                                     ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०९.२०२१-सोमवार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज "जागतिक पर्यटन दिन" आहे. जाणून घेऊया या दिनाचे महत्त्व, इतिहास,लेख  व इतर महत्त्वपूर्ण माहिती.

   September 27-World Tourism Day

--"To raise awareness among the international community of the importance of tourism and its social, cultural, political and economic value."


                             जागतिक पर्यटन दिन-----

     आज २७ सप्टेंबर हा दिवस "जागतिक पर्यटन दिन" म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती.

     गतवर्षी(२०१८)'पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन' हे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, योजना, सुविधा यांचे नियोजन केले. तर या वर्षभरासाठी (२०१९) पर्यटनदिनासाठीचा विषय आहे तो म्हणजे – पर्यटन आणि नोकऱ्या

                         *पर्यटन क्षेत्रातील कारकीर्द*-----

     ज्यांना मुक्त भटकायची, मनमुराद फिरायची आवड आहे अशांना पर्यटन क्षेत्रात कारकीर्द करणे सहज शक्य झाले आहे. आवडच कारकीर्द झाल्यास मिळणारा आनंद मोठा असतो. दळवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्तसंचार करणे आता सोपे झाले आहे. देशाच्या कुठल्याही प्रदेशात किंवा परदेश गमन करण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. वर्षभरात पर्यटन या क्षेत्रात २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. अनेक परदेशी पर्यटन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. सार्वजनिक आणि खाजगी स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने कारकीर्दच्या या क्षेत्राचा घेतलेला आढावा खास कारकीर्दनामासाठी

                             पात्रता-----

     ट्रॅव्हल आणि टुरिझम या विषयात पदवीसाठी बारावी पास आणि पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही विषयातील पदवी आवश्यक आहे.

                              आवश्यक गुण-----

     या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. सहकार्यवृत्ती आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य असेल तर लोकांमध्ये पटकन एकरूप होणे सोपे होते. सामाजिक नितीनियमांचा आणि परंपरांचा आदर करणेही गरजेचे असते. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी. कोणत्या विभागात काम करू शकता? निवास ,वाहतूक , अन्न, समारंभ, साहसी पर्यटन आदी सेवा देणारे हे क्षेत्र आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार यातील अनेक विभागात काम करता येईल.


       
                      (साभार आणि सौजन्य-विकिपीडिया .ऑर्ग /विकी)
                           (संदर्भ-विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून)
                    ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.09.2021-सोमवार.