“जागतिक पर्यटन दिन” - लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, September 27, 2021, 02:26:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "जागतिक पर्यटन दिन"
                                        लेख क्रमांक-3
                                  ----------------------
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२७.०९.२०२१-सोमवार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज "जागतिक पर्यटन दिन" आहे. जाणून घेऊया या दिनाचे महत्त्व, इतिहास, लेख व इतर महत्त्वपूर्ण माहिती.

      जागतिक पर्यटन दिन का साजरा करतात? यंदाची संकल्पना काय?
आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन.....जगभरात हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.

     हिरवा निसर्ग, गर्द झाडी, निळशार समुद्र आणि मस्त भटकंती...हे शब्द कानावर पडले तरी आपल्यातील अनेक जण फिरण्याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करतात. वर्षभरातून एकदा तरी माथेरान, महाबळेश्वर, गोवा ते थेट लडाखपर्यंतचे एखादा प्लॅन हा ठरलेला असतो. आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन.....जगभरात हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.

                    यंदाची संकल्पना काय?-----

     पर्यटनातून ग्रामीण विकास अशी यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊन यंदाचा पर्यटन दिन साजरा केला जातो. कोरोना काळात पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारुन सर्व पर्यटन क्षेत्र सुरु व्हावे, असे अनेक पर्यटकांचं म्हणणं आहे.

     पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते.

     दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जातो. यंदाचा पर्यटन दिवस हा पर्यटन आणि ग्रामीण विकास या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. ग्रामीण भागातील तरुण आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, पर्यटनामुळे कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

                   का साजरा केला जातो पर्यटन दिवस?-----

     जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.


                            (साभार आणि सौजन्य-नम्रता  पाटील)
                                (संदर्भ-टी व्ही ९ मराठी .कॉम)
                          ------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.09.2021-सोमवार.