कोरोना वास्तव चारोळ्या - "तिसऱ्या लाटेचे तृतीय चरण, घरोघरी सुरु झालेय लसीकरण"

Started by Atul Kaviraje, September 28, 2021, 02:11:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                          विषय - घरोघरी लसीकरण
                            कोरोना वास्तव चारोळ्या
          "तिसऱ्या लाटेचे तृतीय चरण, घरोघरी सुरु झालेय लसीकरण"
                                    (भाग-2)
        ------------------------------------------------------


(६)
WHO - ने केलयं जाहीर,कोरोना साथ देईल आयुष्यभर
नियमांचे पालन करा तुम्ही कठोर, जन्मभर
सरकारही कंटाळलंय लस वाटून घरोघरी,
आता प्रत्येकाने सुरु केलीय घरच्या-घरीच लस-फॅक्टरी.

(७)
कोरोना दिवसांगणिक स्वरूप बदलतोय आपले
लसींचेही रूप त्यानुसार पहा बदलत चालले
दर महिन्याकाठी मी एक नवीन लस घेतो,
COVIN APPS. - चा मी LIFE-LONG MEMBER होतो.

(८)
आता रोजचेच झालेय, जणू अंगवळणीच पडलेय
उठायचे ,आटपायचे ,उरकायचे, अन ऑफिसला जायचे
पण जाण्यापूर्वी मात्र न चुकता, अगदी  लक्षात ठेवून,
चहाच्या ढोसण्याबरोबर, लसीचा डोसही घेण्यास नाही विसरायचे.

(९)
कोट घातला आजोबांनी, नथ घातली आजीने
घर गेले होते भरून अत्तर-दाणीच्या सुवासाने
सण सुरु झाला होता, घर भरलें होते उत्साहाने,
नवीन सणांमध्ये कॅलेंडरमध्ये, स्थान मिळवले होते लशीने.

(१०)
SERO SURVEY-सुरु होता,  १००% आली होती IMMUNITY
आनंदी होते जग, खुश होती आज सारी COMMUNITY
डॉक्टर, शास्त्रज्ञांनी  गाठले होते, अंतिम अत्तुच्य शिखर,
विजय पताका, गुढी उभारली जात होती, प्रत्येक घरा-घरांवर.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.09.2021-मंगळवार.