काळ सरतो आहे

Started by marathi, February 15, 2009, 07:53:42 PM

Previous topic - Next topic

marathi

काळ सरतो आहे धीर सुटतो आहे
ह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे
घर तुझेच कधी तुला दाखविता नाही आले
निघून गेले कीतेक्क क्षण बोलता नाही आले
मन झुरते आहे तीळ तीळ तुटते आहे
काळ सरतो आहे धीर सुटतो आहे
ह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे
प्रत्येक वेळी मन म्हणायचे आता नको मग
कधी तरी समजेलच तुला ह्याच आशेवर तग
आशा फसती आहे निराशा वाढती आहे
काळ सरतो आहे धीर सुटतो आहे
ह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे
संपेल उद्या सारे कारनच नसेल मग भेटायच
नाही जमले जे इतके दिवसात आता काय सांगायच
ठरवले जेथे नियतीनेच वेगळे आपण व्हायच
साग आता या प्ररब्धवर किती मी रडायचे
प्रशन पड़तो आहे उत्तरासाठी मी झुरतो आहे
काळ सरतो आहे धीर सुटतो आहे
ह्युद्यातील घर तुझे कोणी तरी लुटतो आहे

nirmala.

घर तुझेच कधी तुला दाखविता नाही आले
निघून गेले कीतेक्क क्षण बोलता नाही आले

CHAANE. :)

Parmita