खुसखुशीत चारोळया-"विनातिकीट मी प्रवास करतो,रेल्वेचा कायमचा जावई होतो !"

Started by Atul Kaviraje, October 01, 2021, 02:03:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           रेल्वेचा विनातिकीट प्रवास-खुसखुशीत चारोळया
    "विनातिकीट मी प्रवास करतो,रेल्वेचा कायमचा जावई होतो !"
                               (भाग-2)
   ------------------------------------------------------


(६)
माहित आहे हा एक चुकीचा मार्ग आहे
मी रेल्वेची एका अर्थी फसवणूकच करीत आहे
पण सवयीचा गुलाम मला गप्पा राहू देत नाही,
माझ्या साऱ्या ऍक्शन मध्ये असते फक्त घाई आणि घाई.

(७)
प्रवास करताना खूप भेटतात मला सगे-सोयरे
प्रत्येकाची असतात कारणे निराळी विनातिकिटाची
खळगी भरण्या पोटाची, गरीबच असतात अधिक,
मजबुरीचं त्यांना घेऊन जात असते या गुन्ह्या-नजीक.

(८)
रेल्वेचा प्रवास मला नेहमीच आवडतो
फार कमी वेळात निश्चित स्थळी सहज घेऊन जातो
तिकीट असो-नसो, वा विनातिकीट प्रवास असो,
प्रवास रेल्वेचा सुरक्षित,सुरळीत,सुखद जाणवतो.

(९)
कित्येक वेळा पकडला गेलोय, गणना नाही
किती वेळा जावई झालोय, माहित नाही
अद्भुतच असतो रेल्वेचा हा प्रवास,
त्याहूनही असतो अद्भुत विनातिकीट प्रवास.

(१०)
संख्या वाढतेय प्रवाश्यांची दिवसेंदिवस
नफ्यात चालली आहे, आलेत रेल्वेला चांगले दिवस
त्यात माझ्यासारखा एखादा फुकट्या लपून जातो,
लाखो तिकिटांमध्ये एखादा विनातिकीट खपून जातो.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.10.2021-शुक्रवार.