Chandra

Started by satchaitali, October 02, 2021, 03:40:17 PM

Previous topic - Next topic

satchaitali

असंख्य या तारकातुनी ,चंद्र वेडा डोकावला
पाहुनी हे विश्व सारे ,क्षणभर भांबावला

काळजाची हि तळमळ ,मौन हा ओठावरी
क्षणभर वाटे सुखावह ,क्षणात येती अश्रूंचा सरी

आघात सारे झेलताना ,चालतो क्षितिजातूनी
मध्ये थोडा सावरूनी ,गुंफतो या आठवणी

कधी लावूनी ढगांमागे ,सोसतो या वेदना
कधी बनुनी आकाश सारे ,व्यापतो मी या गगना

या मनाच्या असंख्य शंका ,कधीतरी संपतील का
मारुनी मिठी या विश्वाला ,प्राण माझे जळतील का