II राष्ट्रपिता महात्मा गांधी II- जीवनपट क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:31:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --

                                 जीवनपट क्रमांक-4
                               --------------------
                                           

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष –
           ----------------------------------------------------------

     सन ९ जानेवारी १९१५ साली कॉन्ग्रेस चे उदारमतवादी नेता "गोपाळकृष्ण गोखले" यांच्या सल्ल्याने महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.  महात्मा गाधी हे 'गोपाळकृष्ण गोखले" यांना आपले राजकीय गुरु मानत असतं. ज्यावेळी महात्मा गांधी भारतात परत आले होते त्यावेळी ते एक राष्ट्रवादी नेता व संयोजक आणि संघटक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती.

     आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे या सारख्या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला होता. गोपाळ कृष्ण गोखले त्यावेळेला "भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे" अध्यक्ष होते. भारतात आल्यानंतर गांधीजीनी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.

     देशातील सर्वसामान्य लोकांचे दु:ख, दारिद्र्य पाहून गांधीजी दु:खी झाले. अहमदाबाद जवळील साबरमती नदीच्या काठी असलेल्या  आश्रमात महात्मा गांधी वास्तव्य करू लागले. भारतातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अहिंसावादी सत्याग्रह करण्याचा अभिनव तंत्र त्यांनी अंगिकारले.

                            चपारण्य सत्याग्रह –
                           -----------------

     सन १९१७ साली बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांवर इंग्रज मळेदाराकडून नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे आणि त्यांना मोजक्याच भावात ते पिक इंग्रजांना विकाव लागत असे. परिणामी त्यांना योग्य तो मोबदला मिळत नव्हता शिवाय, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन कराव लागत होत.

     इंग्रजांच्या या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी सन १९१७ साली बापू चंपारण्यला गेले. गांधीजीनी तेथील जनतेला एकत्रित केलं व त्यांना अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवून दिला. त्यांचा भारतातील अहिंसेचा पहिला प्रयोग यशस्वी झाला, परिणामी लोक त्यांना मानू लागले.

                                खेडा सत्याग्रह –
                              ---------------

     सन १९१८ साली गुजरात मधील खेडा या गावी सतत पडलेल्या पावसामुळे दुष्काळग्रस्त झालं  होत. तेथील पिकांची अवस्था खूपच वाईट होती. अशी परिस्थिती असतांना सुद्धा इंग्रज सरकार  शेतकऱ्यांकडून सक्तीने शेतसारा वासूल करीत असतं. परिणामी तेथिल शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट बनली. महात्मा गांधी यांनी त्याठिकाणी एका आश्रम उभारला आणि आपल्या लहान मोठ्या सर्व अनुयायांना एकत्रित केलं.

     गावातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतले. शेतकऱ्यांना गांधीजीनी शेतसारा न भरण्याचा आदेश दिला, तेव्हा  सन १९१८ साली शेतकऱ्यांनी शेतसारा बंदीची चळवळ सुरु केली आणि महात्मा गांधी यांना त्या चळवळीचे अध्यक्ष बनवले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांच्या समस्येसंबंधी इंग्रज सरकारसोबत चर्चा केली. ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी मान्य करून सर्व कैद्यांची सुटका केली. अश्या प्रकारे महात्मा गांधी यांची प्रसिद्धी संपूर्ण जगभर पसरली.

                       अहमदाबाद येथील कामगार लढा –   
                      -------------------------------

     सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धानंतर देशात खूप महागाई वाढली होती. अहमदाबाद येथील कामगारांनी वेतनवाढी करीता गिरणी मालकांकडे विनंती केली. परंतु, त्याची मागणी मान्य करण्यात आली नाही.

     गांधीजीनी त्या ठिकाणी स्वत: जावून संप पुकारला व उपोषणाला बसले. कामगार देखील गांधीजीन सोबत उपोषणाला बसले. गांधीजींच्या अहिंसावादी आंदोलना समोर गिरणी मालकांनी हार पत्करली व कामगारांना वेतनवाढ दिली.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.