II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:33:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --

                                 जीवनपट क्रमांक-5
                               --------------------


                  महात्मा गांधी यांचा खिलाफत चळवळीला पाठींबा –
                 ------------------------------------------       

     खिलाफत चळवळ म्हणजे भारतीय मुस्लिमांनी खालीफाला पाठींबा देण्यासाठी सुरु केलेली चळवळ होय, तिला "खिलाफत चळवळ" असे म्हणतात. सन १९१४ साली झालेल्या पहिल्या युद्धाच्या वेळी तुर्कस्थान हा इंग्रजांच्या विरुद्ध गटात समाविष्ट होता. तुर्कस्थानचे सुल्तान हे जगभरातील मुस्लीमांचे धर्मप्रमुख म्हणजे होते.

     भारतातील मुस्लीमांचे युद्धात आपल्याला सहकार्य मिळाव याकरिता इंग्लंडच्या पंतप्रधानानी त्यांना युद्ध समाप्तीनंतर तुर्कस्थानला धक्का लावणार नाही असे वचन दिले. परंतु, युद्ध समाप्तीनंतर ते आपल्या वाचनाशी वचनबद्ध राहिले नाहीत. त्यामुळे मुस्लीमांमध्ये संतापाची लाट उसळली.

     यावरून हिंदू- मुस्लीम यांच्या ऐक्यावर आधारीत  राष्ट्रीय चळवळ सुरु केली तर, इंग्रज सरकार नक्कीच वठणीवर येईल अशी गांधीजीना वाटू लागले. त्यामुळे गांधीजीनी 'खिलाफत चळवळीला' पाठींबा दिला. या चळवळीची विशेषता म्हणजे या चळवळीत  हिंदू-मुस्लीम यांचे ऐक्य दिसून आलं होत.

                          असहकार चळवळ –
                         ------------------   

     महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी असल्याने इंग्रजांविरुद्ध त्यांनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध हे तीन शास्त्र वापरले. सन १९१९ साली पंजाबमधील जालियानवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल क्रोधाचा भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघू लगले, ते मोर्चे दडपून काढण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाक करावी लागली.

     महात्मा गांधी यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा प्रकरणी इंग्रज सरकारचा निषेध केला. सहकार चळवळ सुरु करण्यामागे महात्मा गांधी यांचा असा हेतू होता की, भारतातील ब्रिटीशांचे राज्य हे केवळ भारतातील लोकांच्या सहकार्यावर अबलंबून आहे. जर भारतीयांनी त्यांना विरोध केला तर त्यांचे शासन पूर्णपणे ढासळून जाईल. या हेतूने त्यांनी जनतेला आपल्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यास सांगितल.

     सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय सभेचे सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. सन १९२० साली नागपुर येथे झालेल्या राष्ट्रीय सभेत चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार चळवळीच्या ठरवला मान्यता सभेच्या अध्यक्ष पदी विराजमान असणारे चक्रवर्ती विजयराघवाचार्य यांनी दिली. चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे देण्यात आलं होत.

     असहकार चळवळी नुसार, देशातील नागरिकांनी शासकीय कार्यालये, न्यायालये, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.असे केल्याने इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देण्याबाबत काही पाऊले उचलतील असे राष्ट्रीय सभेच्या सदस्यांना वाटत होत. परंतु, गांधीजींचे हे आंदोलन फार काळ टिकू शकले नाही.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.