II राष्ट्रपिता महात्मा गांधी II- जीवनपट क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:47:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --


                                 जीवनपट क्रमांक-8
                               --------------------
                                           

              महात्मा गांधी यांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय –
            ------------------------------------------------------------

     सन १९१८ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धाच्या शेवटीच दुसऱ्या महायुद्धाचा पाया रचला गेला होता. कारण पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्राकडून झालेल्या पराभवामुळे अक्ष राष्ट्राचे बरेच नुकसान झाले होते. पहिल्या महायुद्धानंतर सन १९१९ साली पॅरिस येथे शांतता परिषद पार पडली. मित्र पक्ष आणि अक्ष पक्ष यांच्यात सन २८ जून १९१९ साली व्हर्सायचा तह झाला. या तहानुसार अक्ष पक्षांना मिळविलेल्या वसाहती गमवाव्या लागल्या.

     यामुळे अक्ष पक्षाला आपल्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटले. परिणामी, सन १९३९ साली जर्मनीने पोलंडवर हल्ला केला व त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे मित्रपक्ष या नात्याने ब्रिटिशांनी सुधा त्या युद्धात भाग घेतला. या युद्धात ब्रिटीश सरकारने देशातील लोकप्रतिनिधीना न जुमानता भारतीय जनतेला युद्धात खेचले.  परिणामे देशातील राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिमंडळातून  समुदायीकपणे राजीनामे दिले.

     महात्मा गांधीजीनी जाहीर केलं की, भारत देश या युद्धाचा भाग बनणार नाही. गांधीजींची या युद्धा बद्द्ल अशी धारणा होती की,  हे युद्ध जरी लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढवले जात असेल परंतु, इंग्रज सरकार भारताला स्वातंत्र्य देणार नाही. युद्धाला सुरुवात झाल्याच्या काही काळानंतर महात्मा गांधी यांनी आपले स्वातंत्र्याची मागणी मागण्याचे आंदोलन तीव्र केले. या युद्धादरम्यान महात्मा गांधी यांनी इंग्रजांना 'भारत सोडा' असा आदेश दिला.

     त्यावेळी मंत्रिमंडळात इंग्रज सरकारचे समर्थन करणारे काही पक्ष होते त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली. परंतु, महात्मा गांधी त्यांची पर्वा न करता त्यांनी आपले आंदोलन अजून तीव्र केले.

                           भारत छोडो चळवळ –
                          ---------------------

     दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्रज सरकारने भारतीय प्रतिनिधीना न जुमानता भारतीय नागरिकांना जबरदस्तीने युद्धात खेचले. दुसरे महायुद्ध हे लोकशाही करिता झालेलं सर्वात मोठ युद्ध होत. परंतु हे युद्ध जरी लोकशाही विरोधी असले तरीसुद्धा, इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य देणार नाही.

     हे गांधीजींना माहित होत, कारण इंग्रज सरकारने अश्या प्रकारचे कोणतेच आश्वासन दिले नव्हते. इंग्रज सरकार युद्धात व्यस्त असल्याने महात्मा गांधी यांनी संधी समजून सन १९४२ साली 'भारत छोडो' हे आंदोलन सुरु केलं. या आंदोलनातील सहभागी असणाऱ्या लाखो लोकांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकल. हजारो आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.

     गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की, जो पर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही, तो पर्यंत भारत देश महायुद्धात सहभागी होणार नाही. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना स्पष्ट शब्दात सांगितल की, या चळवळीला हिंसक वळण जरी लागले तरी ही चळवळ कोणत्याही प्रकारे थांबणार नाही. महात्मा गांधी यानी या चळवळी दरम्यान आपल्या भारतीय जनतेला "करा किंवा मारा" असा मूलमंत्र दिला. 'भारत छोडो' चळवळ देश भर पसरली असतांना सन ९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधी आणि त्यांच्या राष्ट्रीय कॉन्ग्रेसच्या सदस्यांना मुंबई मध्ये अटक करण्यात आलं.

     त्यावेळी महात्मा गांधी यांना दोन वर्ष पुण्यातील 'आगाखान पॅलेस' या ठिकाणी कैद ठेवण्यात आलं. सन २२ फेब्रुवारी १९४४ साली महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच निधन झालं. महत्मा गांधी हे पुण्यात कैदेत असतांना त्यांना मलेरियाची लागण झाली, त्यामुळे त्यांची तब्येत खूप खराब झाली अश्या परिस्थितीत देखील इंग्रज सरकारने त्यांची सुटका केली नाही. शेवटी सन ६ मी १९४४ साली उपचारासाठी त्यांनी सुटका करण्यात आली.

     महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या 'भारत छोडो' चळवळीला मोठ्या प्रमाणात यश आले नसले तरी, त्यांनी त्या चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एकत्रित करण्याच महत्त्वपूर्ण काम केलं होत. या चळवळीचा वानवा देशभर पसरल्याने इंग्रजांनी सुद्धा महायुद्ध संपेपर्यंत भारत देशाची सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. यानंतर महात्मा गांधी यांनी आपले 'भारत छोडो' आंदोलन थांबविले.

                   
                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.