II राष्ट्रपिता महात्मा गांधी II-जीवनपट क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 07:52:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II राष्ट्रपिता महात्मा गांधी II
                                  ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज म्हणजे, ०२.१०.२०२१-शनिवार, रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी/कवयित्री बंधू भगिनींस या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महात्मा गांधी याना सर्व भारतवासी प्रेमाने " बापू " असेही म्हणत असत. एक नजर टाकूया त्यांच्या जीवनपटावर --

                                 जीवनपट क्रमांक-10
                                --------------------
                                           

                          महात्मा गांधी यांचे निधन –
                        ------------------------

     ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी दिल्ली येथील बिर्ला बागेत आपल्या सहकाऱ्यांसोबत फिरत असतांना त्यांना 'नथुराम गोडसे' यानी त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधी यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. लोकांची अशी धारणा आहे की, महात्मा गांधी यांनी मृत्युपूर्वी आपल्या मुखातून 'हे राम' असे उद्गार काढले होते.

     सन १९४९ साली महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला, नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, समाजातील अस्पृश्यता निवारण्यासाठी, जातीभेदेची दरी कमी करण्यासाठी या महामानवाने खरच खूप  मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच आज सुद्धा भारतीय जनतेच्या प्रती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल भरपूर आदर आहे.

     त्यांनी केलेल्या कामगिरी करता ते भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात ओळखले जातात. महात्मा गांधी यांच्या जन्मदिन अहिंसादिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. अश्या या महान क्रांतीकारकाला माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून शत शत प्रणाम.

                   महात्मा गांधी यांनी लिहिलेली पुस्तके –
                  -------------------------------
               
इंडिअन होम रूल (हिंद स्वराज्य)
गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
गांधी विचार दर्शन: अहिंसाविचार
गांधी विचार दर्शन: राजकारण
गांधी विचार दर्शन: सत्याग्रह प्रयोग
गांधी विचार दर्शन: सत्याग्रह विचार
गांधी विचार दर्शन: सत्याग्रहाची जन्मकथा
गांधी विचार दर्शन: हरिजन
नैतिक धर्म
माझ्या स्वप्नांचा भारत


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझीमराठी.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.