"आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस" - लेख

Started by Atul Kaviraje, October 02, 2021, 08:05:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस"
                                               लेख
                                 ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.१०.२०२१-शनिवार आहे. आजचा दिवस हा, "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस" म्हणूनही ओळखला जातो. जाणून घेऊया, या दिनाचे महत्त्व, व इतर महत्त्वपूर्ण माहिती.
                                 
             October 02--International day of Non-violence

"To mark the birth anniversary of Mahatma Gandhi and to disseminate the message of non-violence, including through education and public awareness."

     हिंसेमुळे माणूस जिंकू तर शकतो, पण त्याला आत्मिक समाधान मिळत नाही. अशोक सम्राटाने हिंसेने अनेक लढाया जिंकले, भारतावर आपली पताका लावली, संपूर्ण भारताचे ते सम्राट झाले, पण त्यांना शांती लाभली नाही. त्यामुळे त्यांनी अहिंसेचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि यामुळे त्यांना ते सुख लाभले, जे ते सम्राट असताना मिळाले नाही. कारण गौतम बुद्धाने सुद्धा अहिंसेचा पुरस्कार केला होता.

                   आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस----

     सन 2004 मध्ये इराणचे नोबेल पुरस्कार विजेते 'शिरीन ईबादी' यांनी विद्यार्थ्यांना अहिंसेचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' साजरा करण्याची संकल्पना मांडली. ही संकल्पना भारतात माहीत झाल्यावर त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना ही गोष्ट योग्य वाटली. याला समर्थन मिळाल्यावर भारताच्या विदेश मंत्र्यांनी ही संकल्पना संयुक्त राष्ट्रासमोर मांडली. ही गोष्ट संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना पटली आणि त्यासाठी मतदान घेण्यात आले. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 191 देशांपैकी 140 देशांनी समर्थन दिले. यानंतर 15 जून 2007 रोजी महात्मा गांधी जयंतीला 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' म्हणून घोषित करण्यात आले.

              आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो?-----

     02 ऑक्टोबर 1869 रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांनी नेहमी अहिंसेचा पुरस्कार केला. त्यांनी अहिंसेच्या मार्गानेच आपला लढा चालविला व जगाला अहिंसेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच 15 जून 2007 साली संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी साजरा करण्याचे ठरविले.

                    अहिंसेचे महत्व----

     आजच्या युगात अहिंसेला खूप महत्त्व आहे आणि विद्यार्थ्यांना याचे महत्त्व शालेय जीवनापासूनच पटवून दिले पाहिजे. कारण आज जगामध्ये हिंसा मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि माणसे एकमेकांशी भांडतात, तसेच विविध देश एकमेकांशी भांडतात. त्यामुळे नोबेल पुरस्कार विजेते शिरीन ईबादीने अहिंसेचे महत्त्व जगासमोर मांडले.

     हिंसेमुळे माणूस जिंकू तर शकतो, पण त्याला आत्मिक समाधान मिळत नाही. अशोक सम्राटाने हिंसेने अनेक लढाया जिंकले, भारतावर आपली पताका लावली, संपूर्ण भारताचे ते सम्राट झाले, पण त्यांना शांती लाभली नाही. त्यामुळे त्यांनी अहिंसेचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला आणि यामुळे त्यांना ते सुख लाभले, जे ते सम्राट असताना मिळाले नाही. कारण गौतम बुद्धाने सुद्धा अहिंसेचा पुरस्कार केला होता.

     महात्मा गांधी यांचे जगणे साधारण होते, पण समोर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी त्यांच्यापुढे हिंसा आणि अहिंसा असे दोन मार्ग होते, पण त्यांनी हिंसेचा मार्ग न अवलंबून अहिंसेचा मार्ग अवलंबिले. त्यांच्या मतानुसार जी शक्ति अहिंसेत आहे, ते हिंसेत नाही. काही लोकांनी गांधीजींच्या या तत्वाचा विरोध केला, पण त्यांनी आपले तत्व सोडले नाही. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी त्यांनी मान्य केले, कारण त्यांनी हिंसेचे उत्तर हिंसेने दिले. गांधीजीनी शेवटपर्यंत अहिंसेचा पुरस्कार केला आणि आपल्या निश्चयावर ठाम राहिले. त्यामुळेच भारतातील संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि अहिंसेच्या बळावरच त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

     भारतात बौद्ध धर्माबरोबरच जैन धर्माने सुद्धा अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला. वर्धमान महावीर यांनी आपल्या अनुयायांना अहिंसेच्या मार्गाने चालण्याची शिकवण दिली. अहिंसेच्या जोरावरच या दोन धर्मांनी जगभर लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

     यासोबतच भारतातीलच नाही, तर भारताबाहेरील विचारवंतानी सुद्धा अहिंसेचा पुरस्कार केला. उदा. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला इत्यादि नेत्यांनी अहिंसेचा पुरस्कार केला.

     आज विविध देशांमध्ये विकृत वृत्तीचे लोकं आतंकवादी कारवाया करून हिंसा करतात. त्यामुळे अहिंसेच्या तत्वाची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आजच्या युगात अहिंसेचे महत्त्व मुलांना व लोकांना पटवून देणे महत्वाचे आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, तसेच नेत्यानी आपल्या अनुयायांना अहिंसेचे महत्त्व पटवून देणे महत्वाचे आहे.

     त्यामुळे 02 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना आपल्या मनातील हिंसा बाजूला सारून अहिंसेचा मार्ग आचरणात आणला पाहिजे, ज्यामुळे आपली भावी पिढी आनंदात राहू शकेल.


                   (साभार एवं सौजन्य-संदर्भ-आशीषशहारे.कॉम)
                 ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.10.2021-शनिवार.