म्हणी - "उंदराला मांजर साक्ष"

Started by Atul Kaviraje, October 03, 2021, 12:07:18 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "उंदराला मांजर साक्ष"

                                          म्हणी
                                       क्रमांक-48
                                  "उंदराला मांजर साक्ष"
                                -----------------------


48. उंदराला मांजर साक्ष
    -------------------

--वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
--वाइट गोष्टीत एकमेकांची साथ देणे.
--दोन विरुद्ध मतांच्या व्यक्ती सुद्धा एखाद्या विशिष्ट स्वार्थासाठी एकमेकांची बाजू घ्यायला तयार असतात .एकमेकांच्या चांगुलपणाची साक्ष द्यायला सुद्धा तयार असतात .
--वाईट माणसाने दुसर्‍या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे.
--वाईट कृत्य करणारे एकमेकांची पाठ राखतात.
--सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे.
--हिताचे संबंध असलेले दोघेही एकमेकांचे साक्षीदार असण्याची परिस्थिती.
--एखादी वाईट गोष्ट करताना एकमेकांस साथ देणे.
--एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना पाठिंबा देणे.
--मांजराच्या खटल्यांत उंदरास साक्ष द्यावयाची वेळ आली तर तो मांजराच्या विरुद्ध साक्षी देऊं शकणार नाहीं. त्यास अनुकूलच बोललें पाहिजे. यावरुन सर्व आपमतलबी कारभार.
--Evil people follow each other.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  -------------------------------------------

--वाक्य वापर :-- गुन्हेगारांच्या कामाची पद्धत नेहमीच उंदराला मांजर साक्ष या पद्धतीची असते.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.10.2021-रविवार.