" ग्रामस्थांच्या मागण्या अमान्य झाल्या,सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या"

Started by Atul Kaviraje, October 03, 2021, 01:55:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                विषय - सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या
                  व्यंग्य विनोदी मार्मिक राज-कारणी चारोळ्या
  " ग्रामस्थांच्या  मागण्या अमान्य झाल्या,सरपंच उपसरपंच्याच्या खुर्च्या पेटविल्या"
                                        (भाग-2)
----------------------------------------------------------------------


(६)
सरपंच-उपसरपंचानी एक अफलातून लढवलीय शक्कल
खुश होत त्यांनी मनातून, चांगलीच वापरलीय अक्कल
"FIRE-PROOF" खुर्च्यांची डझनावारी स्थापना करून कचेरीत,
खुर्च्या पेटविण्यास त्यांनी जनतेला चक्क आव्हानच केलं ?

(७)
सरपंच-उपसरपंच न्याय-निवाडा नीट करीत नव्हते
ग्रामस्थही त्यांच्या खुर्च्या पेटवून कंटाळले होते
विस्तीर्ण वडाचा पार निवडून त्यावर ठिय्या देऊन सरपंच,
मांडी घालून बसलेल्या गावकऱ्यांसमोर भाषण ठोकत होते.

(८)
गावातील घासलेट-पेट्रोलचा साठा संपुष्टात आला होता
माचीस-काड्यांची आवकही जवळजवळ थांबली होती
खुर्च्या पेटविण्याचे प्रकार आतासे निवळत चालले होते,
सरपंच-उपसरपंच खुर्च्यांवर बसून आरामात समोरील सूर्यास्त पहात होते.

(९)
हे खुर्च्या पेटविण्याचे प्रकरण विधान-सभेत पोचले होते
आमदार-खासदार अचंबित होऊन हे सारे ऐकत होते
तोंडातील शिव्या त्यांच्या तोंडातच जिरत होत्या ?
एकमेकांवर उगारलेल्या खुर्च्या त्यांच्या हातातच स्थिरावत होत्या ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.10.2021-रविवार.