वेड्या मनाची वेडी आशा

Started by Darshan Bhagat, October 03, 2021, 09:53:01 AM

Previous topic - Next topic

Darshan Bhagat

वेड्या मनाची वेडी आशा

माझ्या वेड्या मना तुझ्यातच गुंतून राहू दे
माझ्या या जगण्याला तुझाही स्पर्श लाभू दे

कामाच्या सवडीतून जेव्हा एकांती असतो
पाहून तुझा फोटो मग गाळी मी हसतो

रात्रीचा एकांत काही केल्या झोपवत नाही
तुझी आठवण आल्याशिवाय रात्रही सरत नाही

तूच माझा ध्यास नेहमी तुझीच असते आस
क्षणाक्षणाला विचलित करती तुझ्या आठवणींची रास

खूप काही बोलायचं होत सारं मनातच राहिलं
तुझा नकार ऐकून माझं मनही भरभरून वाहिलं

सर्वकाही असूनही फक्त तुझीच कमी खळते
जिंकूनही हारल्याची जाणीव खूप सळते

तू असावी सोबती अन् दूरवरची भटकंती
नजरेमध्ये नजर मिळूनी हरवून जावे एकांती

तुझ्या आठवणीत जगण्याचा छंद मला जपू दे
माझ्या या अश्रुंना आणखी थोडं वाहू दे

देवा आता माझी एकच इच्छा पूर्ण होऊदे
तिचाही माझ्यावर मनापासून प्रेम जडुदे

खूप समजावलं आता तूच समजाव याला (मना)
वेड्या मनाची वेडी आशा सोडत नाही मला
                                        -दर्शन भगत