"०३ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 03, 2021, 04:28:00 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.१०.२०२१-रविवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                   "०३ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                  --------------------------


अ) ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१६७०: शिवाजी महाराजांनी दुसर्‍यांदा सुरत लुटली.

१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचले.

१९३२: इराकला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.

१९५२: युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.

१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.

१९९५: ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्‍नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खूनाच्या आरोपातून सुटका.

=========================================

ब) ३ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१९०३: हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७२)

१९०७: निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९०)

१९१४: टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २००७)

१९१९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी २०१३)

१९२१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९९६)

१९४७: सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१५)

१९४९: चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.

=========================================

क) ३ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ---------------------------

१८६७: शिवणयंत्राचे संशोधक एलियास होवे यांचे निधन. (जन्म: ९ जुलै  १८१९)

१८९१: फ्रेन्च गणिती एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १८४२)

१९५९: विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १९०९)

१९९५: भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी. यांचे निधन. (जन्म: २६ जुन १९०६)

१९९९: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२१)

२००७: सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदविणारे रवींद्र पाटील यांचे टी. बी. रोगामुळे निधन.

२००७: भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म: ८ जून १९३०)

२०१२: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९२६)

२०१२: भारतीय धर्मशास्त्रज्ञ आणि विद्वानअब्दुल हक अन्सारी यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९३१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.10.2021-रविवार.