कसे कळावे

Started by शिवाजी सांगळे, October 03, 2021, 11:46:32 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कसे कळावे

रातीस या...कसे कळावे तळमळणे माझे
एकांतामधील मनाचे उदास जळणे माझे

कित्येक आठवणींचा बाजार हा भरलेला
विरह वेदनेत तुज शिवाय होरपळणे माझे

होऊनच चेततो येथे अंगार क्षणाक्षणाला
समजावे त्यास कसे धगीतले शेकणे माझे

जळता जळता राख होते मनाची कळेना
मनही जाणते हेच असे उरले जगणे माझे

सांगावे कुणास हल्ली बोलावे मी कुणाशी
बहुदा वेगळेच होऊ लागलेय वागणे माझे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९