खुशखुशीत हसऱ्या चारोळ्या - "ताठ मानेने ऑफिसमध्ये जा,हजेरी यंत्राला चेहरा दाखवा"

Started by Atul Kaviraje, October 04, 2021, 01:07:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


               विषय: ऑफिसमध्ये FACE READING MUSTER
                            "चेहरे वाचे हजेरी-यंत्र"
                         खुशखुशीत हसऱ्या चारोळ्या
            "ताठ  मानेने ऑफिसमध्ये जा, हजेरी यंत्राला चेहरा दाखवा "
                                    (भाग-2)
         -------------------------------------------------------


(६)
बरेच दिवसांपासूनचा सापडला होता जुना दांडी-मास्टर
जेव्हापासून  "INTRODUCE" झाले होते "FACE READING MUSTER"
नोकरीवर कधीच न आलेला नवा चेहरा तोंड दाखवीत होता,
जो इतरांच्या जीवावर उड्या मारून,आजवर मजा मारीत होता.

(७)
ऑफिसचे "LOOK" आता सारे बदलूनच गेले होते
जेव्हापासून  "FACE READING MUSTER" भिंतीवर लावले होते
ऑफिसातील साऱ्या लेडीज त्यातच पाहात होत्या चेहरा,
भिंतीवरचे सारे आरसे गोदामात धूळ खात पडले होते.

(८)
ज्योतिषी पोथ्या सांभाळत घरी बसून होते
गणक-यंत्रानेही  कुंडली पाहणे सोडून दिले होते
आता "FACE READING MUSTER"-ने हजेरी लावून घेता-घेता,
चेहऱ्यावरून भविष्य सांगण्याचेही कंत्राट घेतले होते.

(९)
"FACE READING MUSTER" आज पुष्कळ वैतागला होता
तोच-तोच चेहरा पाहून शेवटी कंटाळला होता
अति उत्साहाने काम करणारा म्हणून विख्यात,
आज तोच स्वतःचा चेहरा पाडून बसला होता.

(१०)
'चेहरा वाचे मस्टर यंत्र" आज म्हातारे झाले होते
इतकी वर्षे सतत काम करून ते बिघडले होते
इतिहासात जमा झालेली शाईची पेने आणि कागद,
यांनी पुनः एकदा आपापले टेबल सांभाळले होते.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.10.2021-सोमवार.