चारोळ्या- " सर्व ZONE NO-KISSING झालीत, प्रेमी-जीवांच्या जीवाची घालमेल चाललीय "

Started by Atul Kaviraje, October 05, 2021, 01:22:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                           विषय : NO KISSING ZONE
                     नरम - गरम खुशखुशीत मुका-विरोधी चारोळ्या
  " सर्व  ZONE NO-KISSING झालीत, प्रेमी-जीवांच्या जीवाची घालमेल चाललीय "
                                       (भाग-2)
--------------------------------------------------------------------------


(६)
अंधारे आडोसे दिमाखात प्रकाशताहेत
वाटिकांमध्ये प्रखर "HALOGEN" लागताहेत
चोरून प्रेम करणारे प्रेम-वीर आता,
या ZONE मुळे उजेडात येत आहेत.

(७)
प्रेम-चाळे, प्रेम-आलाप, प्रेम-विलाप
सारे काही आता काळा-पडद्याआड गेलंय
"NO KISSING ZONE" - ने बरीच मजल मारून,
या "प्रेम-वीरांना" चक्क "पडदा-नशीन" केलंय.

(८)
चंद्रही आता पाळू  लागलाय मौन
चांदण्या म्हणू लागल्यात "हम आपके है कौन ?"
पूर्ण चंद्रात ऊत येणाऱ्या "प्रेम-मस्कऱ्यां"ना,
बंदिस्त करणारे आलंय "NO KISSING ZONE". 

(९)
"मुका घ्या मुका" दादांच्या सिनेमावर बॅन आला होता
"NO KISSING ZONE" ने आता पवित्राच घेतला होता
दादा स्वर्गातून पहात, आठ्या पाडून म्हणत होते,
बरे झाले कायदा उशिरा झाला संमत,
     नाहीतर माझा सिनेमा दाणकन आपटला असता.

(१०)
"मूकाभिनयावर" बंदी आली होती आज
"मूक-मोर्चाही" कायमचाच रद्द-बातल झाला होता
"मूक" शब्द धारण करणारी सर्व क्षेत्रे,
आता या "NO KISSING ZONE" मुळे "मुकी"च झाली होती.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.10.2021-मंगळवार.