"0५-ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 05, 2021, 10:56:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०५.१०.२०२१-मंगळवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे"दिन-विशेष"


                                     "0५-ऑक्टोबर– दिनविशेष"
                                    ---------------------------


अ) ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१८६४: भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले.

१९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक बनले.

१९४८: अश्गाबात येथील भूकपात सुमारे १,१०,००० लोक ठार झाले.

१९५५: पंडित नेहरुंच्या हस्ते हिंदुस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९६२: डॉ. नो हा पहिला जेम्सबाँड चित्रपट प्रदर्शित झाला.

१९८९: मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.

१९९५: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.

१९९८: डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

=========================================

ब) ५ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म.

१९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)

१९२२: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९८७)

१९२३: गुजरातचे राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१२)

१९३२: भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म.

१९३६: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वक्लाव हेवल यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २०११)

१९३९: वॉल्टर वुल्फ रेसिंग चे संस्थापक वॉल्टर वुल्फ यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.

१९७५: ब्रिटीश अभिनेत्री केट विन्स्लेट यांचा जन्म.

=========================================

क) ५ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)

१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

१९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

१९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०७)

१९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

१९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९२: नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.

१९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

२०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)
=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.10.2021-मंगळवार.