" विलंब ??"

Started by Ashok_rokade24, October 06, 2021, 12:18:38 AM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

थेंब जणू हे अळवा वरचे ,
अशी निसटून स्वप्ने गेली ,
विलंब होता क्षण भराचा ,
ओंजळ रिकामी मातीओली ॥

साथ ही लाभावी छायेपरी ,
ईच्छा मनीचीओठी नआली,
दान सारे उलटे पडले
नियतीने ही वेळ साधली ॥

विलंब होता क्षण भराचा ,
ओंजळ रिकामी मातीओली ॥

नाते जुळावे दोन जिवाचे ,
कशी न भावना ऊमजली ,
घडून गेले क्षणात सारे ,
आठवांची ही माळ राहीली  ॥

विलंब होता क्षण भराचा ,
ओंजळ रिकामी मातीओली ॥

पाणी जणू अळवा वरचे ,
तशी साथ तुझी न लाभली ,
हाती आता न ऊरले काही ,
सांज वेळ आयुष्याची झाली ॥

विलंब होता क्षण भराचा ,
ओंजळ रिकामी मातीओली ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .