चारोळया-"नागाच्या पिल्लानी घर भरलंय, सर्प-मित्रांच्या डोळ्यांचे पारणे फिटलंय"

Started by Atul Kaviraje, October 06, 2021, 01:38:46 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      विषय : घरात सापडली नागाची पिल्ले
                    खुमासदार मार्मिक गंभीर विनोदी चारोळया
        "नागाच्या पिल्लानी घर भरलंय, सर्प-मित्रांच्या डोळ्यांचे पारणे फिटलंय"
                                      (भाग-2)
      --------------------------------------------------------------


(६)
वासुकी,तक्षक, अन अन्य नाग-देवता
पाताळ-पाण्यातून भूवरी आलेत
त्यांच्या वंशजांचा नीट सांभाळ चाललेला पाहून,
मनुष्यास ते वरदान देते झालेत.

(७)
सर्प-मित्राचा पगार गलेलठ्ठ झालाय
जेव्हापासून नाग-पिलावळ घरी सापडू लागलीय
आता तर ते बोनसचीही मागणी करू लागलेत,
जेव्हापासून ते गावो-गावी फुल टाइम तळ ठोकून बसलेत.

(८)
नाग-कन्या, नाग-पुत्र, मान्यवर साधूंच्या मठीत
भक्त-गणांची रीघ वाढत चाललीय
येताना प्रत्येक भक्ताने, सश्रद्ध भेट देण्या,
नागांची छोटी - छोटी पिल्लेही आणलीत.

(९)
अखंड पंच-क्रोशित माझे गाव गाजू लागलेय
बत्तीस-शिराळेच्या वरचढ  माझे घर झालेय
गिनीज - बुकात माझे नांव छापून आलेय,
नाग-पिल्लानी माझे सारे घर भरून गेलंय.

(१०)
विषारी (वाकड्या) नजरेने पहायची, माझ्या घराकडे
आता कोणीही हिम्मत नाही करत
घरी  विष-गरळानी  युक्त असे १०० रांजण,
काठो-काठ आता चाललेत भरत.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.10.2021-बुधवार.