बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

Started by anagha bobhate, April 08, 2010, 01:16:54 PM

Previous topic - Next topic

anagha bobhate

बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

आला धावत धावत
आईज्वळीरडत
माय लेकरांची अखेरची भेट ती.
लोक म्हणतात आई
तू वाचणार नाही
मला एकट्याला सोडून तू मरू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

देव राहतो कुठे ग
आकाशी त्याचे घर
त्याचा पूर्ण पत्ता लीहून तू दे तरी
पत्र पाठवीन तुला
वेळ लागला तरी
त्याचा राग काही तू मानू नको.
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

मी नसणार जगात
तू होशील अनाथ
पण माझी आठवण कधी तू करू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

प्रेमे कवटाळी त्याला तीने प्राण सोडीला
आणी म्हणाली ती त्याला बाळा तू रडू नको
आजन बाळाला देवा दुखी करू नको
बालापसुनी दूर आईला नेऊ नको.

author unknown

MK ADMIN


anagha bobhate

he gan nehami mazi aaai mhanun dakhvaychi lahan astana, aani nehami te ekatana maze dole bharun yayache. tya diwashi sahaj aathval mhanun post kel. tichya balpanichya maitrinichi hi real gosht aahe, aani tyanchya gharatalya ekanech he gan lihilel aahe.