वास्तव चारोळया-"वेळा नियमित पाळणारा डब्बेवाला, त्याच्या घड्याळाचा काटा स्थिर झाल

Started by Atul Kaviraje, October 08, 2021, 02:11:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                            विषय : मुंबईचा डब्बेवाला
                          कोरोना गंभीर वास्तव चारोळया
     "वेळा नियमित पाळणारा डब्बेवाला, त्याच्या घड्याळाचा काटा स्थिर झाला"
                                       (भाग-2)
  -------------------------------------------------------------------


(६)
आज गाडीत भयाण शुकशुकाट आहे
डब्यांचा खडखडाट पूर्ण थांबला आहे
कोरोनाला यश त्यांचे नाही पाहवले,
इतरांसारखाच डब्बेवालाही आज उदास आहे.

(७)
डब्बा पोचविण्यास त्याचे हात शिवशिवतात
आपसूक नजर घड्याळ पहात, घेतेय वेध
पण रोजीरोटीवर त्यांच्या आणून गदा,
कोरोनाने इतरांच्या रोटीला कायमचाच दिलाय छेद.

(८)
डब्यावरल्या कोड नंबरचा  रंग सुकून गेलाय
ज्यावरून डब्बा पोचवला जायचा अचूक ठिकाणी
बहुतेक इतिहासजमाच होईल हा ऐतिहासिक डब्बा,
जशी कामगारांची बंद पडली होती तेव्हा गिरणी.

(९)
कोरोनाने सारेच बदलून टाकलंय
होत्याच अगदी नव्हतं केलंय
डब्बेवालाही नाही सुटला यातून,
कधी सुटणार माणूस या कोरोनाच्या यातनांतून ?

(१०)
काल,
     मुंबईची ओळख होती हा डब्बेवाला
     डब्बेवाल्यांमुळे मुंबईचे नाव होते जगात
आज,
     रेल्वे गाडीचा आवाज दूरवरून टिपत,
     डब्बेवाला वेध घेत आहे भविष्याचा !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2021-शुक्रवार.