मार्मिक-चारोळ्या "जीभ उचलली, लावली टाळूला, जीभ घसरली, सज्ज व्हा बदनामीला"

Started by Atul Kaviraje, October 10, 2021, 02:21:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                  वास्तव राजकारणी मार्मिक गंभीर चारोळ्या
            विषय : " नेत्यांची एकमेकांवरील शाब्दिक घसरगुंडी "
    "जीभ उचलली, लावली टाळूला, जीभ घसरली, सज्ज व्हा बदनामीला"
                                     (भाग-2)
----------------------------------------------------------------


(६)
चार बुके जास्त शिकली
"जीभ" चराचरा होती चालत
त्यापेक्षा तो अनपढ बरा,
अदबीने सर्वांचा मान राखत.

(७)
काय बोलू नी - काय नको ?
असे नेत्याला झाले होते
प्रथमच उभा होता "भाषणाला",
वाभाड्याना तोंड फुटले होते.

(८)
वैर दाखविण्यास जागा नव्हती
खरी गोम त्यातच तर होती
हाणामारीची सांगता होत होती,
"निंद्य-शब्दांना" वाचा फुटत होती.

(९)
काय झालयं शिकलेल्या लोकांना
नेत्यांचे अनुकरण करीत होते
पावलांवर पावले ठेवून त्यांच्या,
"अप-शब्द" बाणांनी घायाळ करीत होते.

(१०)
या "अप-शाब्दिक" वाक्प्रचारांवर एकाने
एकदा मोठा ग्रंथ लिहिला
गिनीज बुकात नावं जाऊन,
टनावरी की हो भरला !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.10.2021-रविवार.