"आंतररराष्ट्रीय बालिका दिन"-मुलगी घोषवाक्य

Started by Atul Kaviraje, October 11, 2021, 01:59:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "आंतररराष्ट्रीय बालिका दिन"
                                         मुलगी घोषवाक्य
                                 ----------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज दिनांक ११.१०.२०२१-सोमवार आहे. आजचा दिवस "आंतररराष्ट्रीय बालिका दिन" या नावानेही ओळखला जातो. वाचूया, मुलींवर रचलेली काही घोषवाक्ये.

Girl-Child Slogans (मुलगी घोषवाक्य)---

मुलींना समजू नका भार
मुलींना समजू नका भार, जीवनाचा खरा आहे आधार.

ज्या घरी मुलगी आली,
समजा स्वत: लक्ष्मी आली.

मुलीला जे देतील ओळख,
तेच आई-बाप आहे महान.

आपली तृष्णा आहे निरुपयोगी,
मुलगीशिवाय संसार चालत नाही.

मुलीला अधिकार द्या !
मुलासारखे प्रेम द्या !
मुलगी वाचवा !

जर मुलगा असेल वारस,
तर मुलगी आहे पारस !

आनंदी बालिका, भविष्य देशाचं.

जगण्याचा हक्क तीचा पण आहे,
फक्त तिला, तुमचं प्रेम हवे आहे.

मुलगा पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.

मुलींना वाचवा मुलींना शिकवा, देशात साक्षरता वाढवा.

असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.

मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती,
गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती.

मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको.

मुलगा शिकला तर एक घर उजळेल, मुलगी शिकली तर दोन घर उजळतील.

विचार करा आणि पाऊल उचला, शिक्षणाचे शश्त्र द्या मुलीला.

आमच्या मुली जेव्हा शाळेत शिकतील तेव्हा समृद्धी येईल.

अठराची नवरी, स्वावलंबे संसार सावरी.

देशाला हवेत शिवबा, जिजाऊ, म्हणून स्त्रियांना मानाने वागवू.

मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.

आई नाही तर मुलगी नाही, मुलगी नाही तर मुलगा नाही.

आज आणि फक्त आता पासून मुलीं शिकणार मुलीं शिकणार.

लेखिका - स्मिता  हळदणकर
--------------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीस्लोगन्स.कॉम)
                  ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.10.2021-सोमवार.