जय मराठी….!!!

Started by Satish Choudhari, April 08, 2010, 07:36:29 PM

Previous topic - Next topic

Satish Choudhari

जय मराठी....

मराठी रंग मराठी गंध
मायभुमीचा ओला सुगंध
मिसळत आहे पसरत आहे
मराठी बाणा जागवत आहे
स्वराज्य पुन्हा मागत आहे
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...

शिवरायांची किर्ती त्यांच्या
अंगात पुन्हा सळसळते
मायबोली मराठी पुन्हा
गीत स्वराज्याचे गाते
एकच सुर निघत आहे ...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


कोंकणी ऐरणी पुणेरी वर्हाडी
आमची हि मायबोली
क्रुष्णा कावेरी वर्धा नर्मदा
आणि ती गोदावरी
एका धारेत मिसळत आहे
हा मराठी माणुस जागत आहे....
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


ना धर्माचा ना जातीचा
जो मानतो स्वत:ला ह्या मातीचा
जो जगतो मराठी तो मराठी
जो बोलतो मराठी तो मराठी
हा मराठी धर्म पसरत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


द्म्यानदेव माऊली अन् तुकोबांच्या
अभंगात जन्मली ती मराठी
पु.लं पासुन कुसुमाग्रजांच्या
लेखनीत सजली ती मराठी
हा मराठी झेंडा फडकत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


भिमरायांच्या त्या क्रांतीमध्ये
पेटून उठली ती मराठी
जोतिबांच्या शिकवणीमध्ये
अस्मिता जागली ती मराठी
हा मावळा मराठी पेटत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


एकसंग असावे एकबंध असावे
हे मराठी नाते मनोमनी रुजावे
ह्या भारतमातेच्या लेकरांमध्ये
ह्या महाराष्ट्राचे अव्वल स्थान असावे
ह्या सतिशाला हे वाटत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


-- सतिश चौधरी

raje94