मृगजळ !!!

Started by Ashok_rokade24, October 11, 2021, 09:10:00 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

स्वप्नातील जिव्हाळा स्वप्नातच राहीला ,
तिरीप उन्हाची येता खेळ सारा संपला ॥

जलाशय हा प्रेमाचा तुडूंब भरला ,
ओंजळ करता पुढे सारा आटून गेला ॥

स्वप्ने सारी उद्याची वादे इरादे सारे ,
सोडून अंधार येथे अस्ताला रवि गेला ॥

रोखल्या नजरा किती सामना न केला ,
भविष्यकाळ तो सोनेरी भूतकाळ झाला ॥

माणुसकीचा इथे खेळ असा मांडला ,
वादळ जरासे येता डाव सारा मोडला ॥

सुखाची परीभाषा इथे वेगळी आहे ,
बळी पडतो माणूस खोट्याअहंकाराला ॥

ज्ञात असूनही इथे जरी सारे काही ,
तरी सदैव सावज फसे मृगजळाला ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .