"११ ऑक्टोबर– दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, October 11, 2021, 10:47:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११.१०.२०२१-सोमवार .जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "११ ऑक्टोबर– दिनविशेष"
                                    -------------------------


अ) ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना.
    ------------------------------

१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना.

१९८७: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवन ची सुरवात झाली.

२००१: व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर.

२००१: पोलरॉईड कार्पोरेशनने दिवाळखोरी जाहीर केली.

=========================================

ब) ११ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१८७६: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा चांचल, माल्डा, बांगला देश येथे जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ – कलकत्ता)

१९०२: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)

१९१६: पद्मविभूषण समाजसुधारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१०)

१९१६: चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९७)

१९३०: पत्रकार व स्तंभलेखक बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

१९३२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट २०१२)

१९४२: चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म.

१९४३: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९९६)

१९४६: परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

१९५१: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.

=========================================

क) ११ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१८८९: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८१८)

१९६८: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९०९)

१९८४: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन. (जन्म: २७ जून १९१७)

१९९४: कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक काकासाहेब दांडेकर यांचे निधन.

१९९६: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू कीथ बॉईस यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९४३)

१९९७: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विपुल कांति साहा यांचे निधन.

१९९९: मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.

२०००: स्कॉटलंड देशाचे पहिले मंत्री डोनाल्ड डेवार यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९३७)

२००२: अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.

२००७: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९३१)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.10.2021-सोमवार.