म्हणी - "एक ना धड भाराभर चिंध्या"

Started by Atul Kaviraje, October 11, 2021, 11:37:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "एक ना धड भाराभर चिंध्या"

                                         म्हणी
                                     क्रमांक -53
                             "एक ना धड भाराभर चिंध्या"
                            ---------------------------


53. एक ना धड  भाराभर  चिंध्या
    --------------------------

--एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
--एकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे अर्धवट होतात.
--एका वेळी अनेक कामं अंगावर घेतली तर कोणतच काम नीट होत नाही आणि कोणत्याही कामांमध्ये उत्कृष्टता गाठता येत नाही त्यामुळे कोणतच काम सर्वोत्कृष्ट होत नाही , सर्व कामे अर्धवट होतात .
--कोणतंही एक काम नेटाने न करता, इतर गोष्टींच्या पाठी धावणे.
--अनेक गोष्टी अपूर्ण करून , कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे.
--एकाच वेळेस अनेक कामे हाती घेतल्यास एक हि काम नीट पूर्ण होत नाही.
--सगळेच अपूर्ण.
--एकाच वेळी अनेक कामे केल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.
--एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एक ही काम धड होत नाही. सगळेच अपूर्ण राहते.
--एकाच वेळी अनेक कामे केली की कोणतेच काम पूर्ण होत नाही.
--चिंध्यांची मोठी रास असून त्यांत धड एकहि तुकडा नसेल तर त्यांचा नेसावयाच्या कामीं कांहीं उपयोग होत नाहीं. नेसायला एखादें धडच वस्त्र लागतें, चिंध्याच्या भार्‍याचा नेसायला उपयोग होत नाहीं. 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला॥'
--एकहि जर वस्त्र धड नसेल तर अनेक भाराभर चिंध्यांचा नेसण्याच्या कामी काय उपयोग? एकहि चांगली धड गोष्ट नाही तर फुटकळ तुकड्या ताकड्यांचा काही उपयोग नाही. 'एक धड ना भाराभर त्या चिंध्या कशाला।।'  ''कांही दिवस हा अभ्यास कर, कांही दिवस तो कर, पुढें तिसराच हातीं घे... असें होतां होतां 'एक ना धड' असा प्रकार होतो.
--Jack of all trades and master of none.
--If you undertake several tasks at the same time, one task will not be completed properly.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                --------------------------------------------

             गोष्ट----

     एक ससा होता त्याचे नाव पिल्लू. त्याचे एक शेत होते. पण त्याचे शेत वाळले होते. एकदा त्याच्या गावी पाऊस आला. त्याचे शेत टवटवीत झाले. तेंव्हा त्याला वाटले की, आपले शेत तर आता टवटवीत झाले. आता आपल्याला काही करायची गरज नाही. असे म्हणून पिल्लू सशाने शेताकडे दुर्लक्ष केले.

     एके दिवशी त्याच्या शेतात काही जनावरे घुसली आणि शेताची नासधुस केली. तेथे एक बगळा आला आणि पिल्लू सशाला सांगितले की, तू मासेमारी कर.

     एक दिवशी पिल्लू ससा आपली सायकल घेऊन मासेमारी करायला नदीकाठी गेला. त्याचा मित्र तेथे बसला होता. पिल्लू सशाने एक मासा पकडला. पण तो फार लहान होता. परत असेच झाले. शेवटी तो कंटाळला त्याच्या मित्राने त्याला सांगितले की, तू सायकल रेस मध्ये भाग घे. त्याने आपली सायकल घेतली आणि सायकल रेसमध्ये भाग घेतला. पिल्लू ससा सर्वात पुढे होता. तो जिंकत होता. म्हणून त्याने दोन्ही हात सोडले व तेवढयातच तो पडला. तितक्यात तेथे शेतावरचा बगळा आला आणि पिल्लू सशाला म्हणाला की एकाच वेळी अनेक गोष्टी करू नये. त्या दिवसापासून ससा फक्त आपले शेत सांभाळतो व मजेत रहातो.

     म्हणूनच म्हणतात ना एक ना धड भाराभार चिंध्या.

लेखक – रौनक पत्की
-------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठीवरल्ड.कॉम)
                 -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.10.2021-सोमवार.