चारोळ्या-"घेऊन नेत्यांनी जन-जागृती दिंडी, अडविल्यात साऱ्या रस्त्यांच्या खिंडी"

Started by Atul Kaviraje, October 12, 2021, 01:52:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                       विषय : नेत्यांची जन-जागृती दिंडी
                       वास्तव राजकारणी मार्मिक चारोळ्या
     "घेऊन नेत्यांनी जन-जागृती दिंडी, अडविल्यात साऱ्या रस्त्यांच्या खिंडी"
                                     (भाग-2)
  ---------------------------------------------------------------


(६)
बहुजन हिताय, बहुजन सुखाय I
"दिंडी" काढितो आम्ही जन-जागराय I
खूपच जवळी आल्यात निवडणूकाय I
जमवितो माणसे आम्ही प्रचाराय II

(७)
"दिंडीला" उत्सवाचे स्वरूप आलंय
आषाढी एकादशीच्याही तोडीस तोड
पांडुरंग पहातोय, रखुमाईला सांगतोय,
आता तरी पंढरपूर सोड !

(८)
रथात नेता उभा होता
जनतेस आशिष देत होता
नवं-जीवन देणाऱ्या या जनार्दनाला,
जनता-जनार्दन नमन करीत होता.

(९)
रस्ता "दिंडीने" फुलला होता
जनतेचा चेहरा खुलला होता
जागृत करणारा, उद्धार करणारा,
तिचा नेता-देव प्रगट झाला होता.

(१०)
उत्साहात जनता घोषित होती
"दिंडीत" स्वागत करीत होती
पुढील वर्षाच्या "दिंडीसाठी" आजच,
नेत्यांची तयारी चालली होती.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.10.2021-मंगळवार.