"नवरात्रोत्सव"-दिवस सातवा-लेख क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 01:15:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         "नवरात्रोत्सव"
                                          दिवस सातवा
                                            रंग निळा
                                         लेख क्रमांक-4
                                      -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक 13.१०.२०२१ -बुधवार, नवरात्रीचा सातवा दिवस आहे.  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र जोगवा , भोंडला आणि  इतर . (आजच्या दिवसाचा रंग निळा  आहे.)

    नवरात्रीत गुजराथी महिला गरबा नृत्य करतात. सजूनधजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाचगाणे सुरू असते. 'रंगमा रंगमा, रानी बहुचरमा खेले रंगमा', 'नौरात्रीमा नौ नौ दिवसमा', किंवा 'पंकिडा तू उड न जाना, पावा गडोरे महाकाली से मिलने चलो, गरबा खेलेंगे' अशा पारंपरिक गीतांवर, मंदिरामध्ये गरबा खेळला जातो. पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हजारोंची तिकिटे लावून, विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला, नाचला जातो. त्यामध्ये बरेच गैरप्रकारही होतात. असेच गैरप्रकार दर्शनाच्या रांगांमध्येही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे अस्तंगत होते. तरुणाईचा जोश मान्य, पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण, उत्सवांमधील शुद्ध, पवित्र भावना जपली पाहिजे. देवीच्या विविध रूपांची आराधना करताना, मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे.

'पूर्ण बोधाची, बोधाची घेईन परडी,
आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीन दरडी
मनोविकार करीन कुरवंडी
अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी
ऐसा जोगवा जोगवा मागीन'

    अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून, देवीच्या चरणी लीन व्हावे. केवळ नऊ दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून, मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे, सामर्थ्यांचे दर्शन देवीने घडविले, तशी शक्ती, सामथ्र्य आपल्या ठायी निर्माण व्हावे, याचसाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.

     कोकणस्थ लोक अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी उकडीचा मुखवटा करून देवी उभी करतात आणि संध्याकाळी सहा वाजल्यापासून, रात्री बारा वाजेपर्यंत घागरी फुंकतात. उदवलेल्या मातीच्या घागरी, दोन हातांमध्ये धरून, त्या घागरींमध्ये प्राणशक्ती फुंकीत 'फूं फूं' करून, तालावर नाचणे म्हणजेच तल्लीन होणे. तो उदाचा सुगंध, हातातील मातीची घागर हातून निसटू नये यासाठी सांभाळणे आणि तिच्यातील उदाचा गंध मस्तकात भरून घेत, त्यामध्ये फुंकर घालणे, यासाठी लागते ती तल्लीनता, एकाग्रता. 'घागरी घुमताती, आनंदे नाचताती, महालक्ष्मी आली राती,' त्या एकाग्रतेनेच, त्या शक्तिरूपाचा जागर केल्यास, आपण शक्तिमान होऊ, हा विश्वास बाळगून, उत्सव साजरे केले पाहिजेत, असे म्हणावेसे वाटते.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.कॉम)
                 ------------------------------------------


                                         रंग नवरात्रीचे
                                            कविता
                                      ---------------

आकाशासही  लागे  जणू
धरतीचा  लळा
पसरला  चोहीकडे 
रंग  हा  निळा
==============
सोनेरी  सूर्य  चमकतोय
निळ्याभोर  आकाशात
पृथ्वीही  न्हाहून  निघाली
आज  निळ्या  प्रकाशात


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता .कॉम)
                  --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.