श्रीमंत चारोळ्या - "घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला"

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 01:34:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०१.०९.२०२१,बुधवार रोजी, बीबीसी न्युज मराठी या यु - ट्यूब चॅनेल वर एक व्हिडीओ दाखविण्यात आला होता, की  पालघर येथील कोळी बांधवाना, खोल समुद्रात मासेमारी करताना चक्क, बहुमूल्य असे घोळ मासे त्यांच्या जाळ्यात अडकले होते. अत्यंत बहुमूल्य, बहुमोली, औषधी तत्त्वांनी, आणि गुणधर्मानी युक्त अश्या या घोळ माश्याना देशभरात, व परदेशातही मागणी असते. त्यासाठी व्यापारी हे कितीही बोली लावण्यासाठी तयार असतात.

          तर सांगायचा  मुद्दा हा की , कोळी बांधवांच्या जाळ्यात एकूण १५७ घोळ मासे सापडले होते, व त्यांची बाजारात एकूण किंमत  ही अंदाजे १ कोटी तेहेत्तीस लाख (रुपये-१,३३,००,०००/-) इतकी आहे. म्हणजे एका  घोळ माशाची किंमत ही रुपये-८४,७१३/- इतकी मोजली गेली आहे. सांगायला नको, की कोळी बांधवाना ही जणू लौटरीच लागली आहे. असो, ऐकुया, काही मजेदार, वास्तव, या घोळ माशाप्रमाणेच श्रीमंत  चारोळ्या.


                        विषय : जाल्यात गावले घोल (घोळ) मासे
                            मजेदार, वास्तव, श्रीमंत चारोळ्या
            " घोळ मासा जाल्यामंदी गावला,आज आम्हाला कुबेरच पावला"
                                        (भाग-2)
          --------------------------------------------------------


(६)
जाळ्यात "घोळ" गवसला होता
असूयेचा जाळ पसरला होता
यालाच कसा सापडतो "घोळ" ?
घोळात घोळ वाढतच होता !

(७)
"घोळ" माशांची शेती पिकवलीय
अवदा  मायंदाळ पीक आलंय
अन बायकोला सोन्याने मढवून,
"कोळीराजानं" समिंदराच उपकार मानलंय.

(८)
हात जोडून तुज बा-रत्नाकरा
एकच मागणे घालितो, "कोळीराजा"
दररोज जाळ्यामंदी माझ्या एकतरी,
"घोळ" सापडावा रुपेरी, ताजा.

(९)
उदारता, त्याच्या लाटेतून फुटतेय
दानीपणा त्याच्या जळातून ओघळतोय
नारळी पुनवेला  सोन्याच्या नारळाबद्दल,
सागर, सुवर्ण-कलशाचे, "घोळ-दान" देतोय.

(१०)
समुद्राने मला भरभरून दिलंय
"घोळांनी" होडीला शिगोशीग "घोळलंय"
होडी वल्हवित किनारी नेतोय,
वल्हवितI-वल्हवितI श्रीमंतीचे स्वप्नही पहातोय.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.