म्हणी- "एका हाताने टाळी वाजत नाही"

Started by Atul Kaviraje, October 13, 2021, 11:44:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "एका हाताने टाळी वाजत नाही"

                                             म्हणी
                                          क्रमांक -55
                                "एका हाताने टाळी वाजत नाही"
                               ------------------------------

55. एका हाताने टाळी वाजत नाही
     ---------------------------

--दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
--कोणत्याही भांडणात दोष एकाचा नसतो.
--संस्कृतपर्यायः - नैकेन चक्रेण गती रथस्य।
   जसा आपण एका हाताने टाळी वाजवू शकत नाही त्याकरता दोन हातांची गरज असतेच . त्याप्रमाणे कोणतीही चुकीची किंवा वेगळी घटना घडली तर ती कोणा एकट्याची चूक नसून त्या प्रसंगात उपस्थित असणाऱ्या दोन्ही व्यक्तींच्या वागणुकीचा परिणाम असतो .
--कोणत्याही गोष्टीत एकाच व्यक्तीची चूक नसते. कारण प्रत्येक गोष्टीला दोन्ही पैलू असतात.
--भांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
--प्रत्येक कार्यात दोनी बाजूचा सहभाग असावा.
--दोन व्यक्तींच्या भांडणात फक्त एकाला दोष देऊन चालत नसते. त्यात ते दोघी दोषी असतात.
--भांडणाचा दोष एकI पक्षाकडेच असत नाही.
--कोणत्याही भांडणात, भांडणाच्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
--घडणा-या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
--दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्याचाच  दोष असतो असे नाही.
--भांडणाचा दोष एकाकडे नसतो.
--मराठी वाक्संप्रदाय - टाळी वाजण्यास दोन हात पाहिजेतच. तेव्हां दोघांच्या भांडणात दोष दोघाकडेच  असतो, नुसता एकाकडेच नसतो. 'एके हातें टाळी। कोठें वाजते निराळी।' -तुगा. 'एक्या हातें कधिंतरि मुली वाजते काय टाळी।' -सासरची पाठवणी. यथैकेन न हस्तेन तालिकः संप्रपद्यते। तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम्।।-पंचतंत्र २.१३८.
उत्तर-प्रत्‍युत्तरानें नेहमी भांडण वाढत असते. दोन प्रतिपक्ष असल्‍याशिवाय नेहमी भांडण लागत नाही. एखाद्याने खूप भांडण काढण्याची खटपट केली तरी दुसर्‍या पक्षाने फार गम खाल्‍ली, तर भांडण होत नाही.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.10.2021-बुधवार.