व्यंगात्मक चारोळ्या - "अंगावर सोन्याचे वजन वाढलंय, सोन्याने माझं वजनच वाढवलंय !"

Started by Atul Kaviraje, October 14, 2021, 01:03:32 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय : सोन्याने मढलेली आजची तरुणाई
                       वास्तव मार्मिक व्यंगात्मक चारोळ्या
       "अंगावर सोन्याचे वजन वाढलंय, सोन्याने माझं वजनच वाढवलंय !"
                                     (भाग-2)
     -------------------------------------------------------------


(६)
लक्ष्मी-मातेचे स्वागत होत होते
"सुवर्ण"-नगरी "सोन्याने" नटली होती
"सुवर्ण"-वेशीवर "सुवर्ण"-पताका झळकत होत्या,
"सोन्याचा" झगमगता "सोन"-सळी नाच सुरु होता.

(७)
उद्योगधंदे चांगलेच बरकतले होते
खोऱ्यांनी पैसे ओढीत होते
सोनारांच्या नशिबाचा भाग्योदय होऊन,
मुशीतून "सुवर्ण"-अलंकार निर्मित होते.

(८)
बप्पीदाची आम्ही  सारी  लेकुरे
वारसा त्याचाच चालवतोय पुढे
गळ्यात "सुवर्ण"-माळा, बोटात "सोन"-अंगठ्या,
चौघडे वाजताहेत आमच्या मागे-पुढे.

(९)
श्रीमंतीचे  प्रदर्शन जरूर व्हावे
पण असे अवजड 'सुवर्ण"-दागिने घालून ?
शरीर भार सोसेल का त्यांचा ?
मान जाईल की हो सारी अवघडून !

(१०)
हौसेला मोल नसते खरंय
उठता-बसता अंगावर "सुवर्ण"-दागिने चढवतोय
कुणीही पहात नाही आज-काल माझ्याकडे,
मी माझ्याच मनाचे समाधान करतोय.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.10.2021-गुरुवार.