म्हणी - "ऐकावे जनाचे करावे मनाचे"

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 12:04:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "ऐकावे जनाचे करावे मनाचे"

                                        म्हणी
                                     क्रमांक -56
                             "ऐकावे जनाचे करावे मनाचे"
                            --------------------------


56. ऐकावे जनाचे करावे मनाचे
    -------------------------

--लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
--जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
--संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:
-- एखाद्या घटनेबाबत उपस्थित परिस्थितीतील सर्व लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे व नंतर बुद्धीचा व मनाचा वापर करून योग्य निर्णय घ्यावा. सर्व आधी ऐकून घेण्याची मनाची तयारी हवी.
--सर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा.
--लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
--लोकांचे शांतपणे ऐकून घ्यावे आणि स्वतःला वाटेल तसं योग्य ते करावे.
--कोणत्याही कामाबाबत दुसर्यांचे मत घ्यावे; परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे.
-- लोकांचे मत समजून घ्यावे. पण आपल्याला योग्य वाटेल ते करावे.
--Listen to people calmly and do what you think is right.

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                ---------------------------------------------

                    उदाहरण-विचार-लेख---
 
                  ऐकावे जनाचे, करावे मनाचे---

     जास्तीत जास्त लोक जीवनात अपयशी ठरण्याच मुख्य कारण म्हणजे त्यांनी घेतलेले निर्णय ते वारंवार बदलतात आपल्या निश्चयाशी ते प्रामाणिक , ठाम राहत नाहीत, शेजाऱ्यांच आपल्याबद्द्लच गॉसिपिंग , लोकांचे टोमणे, त्यांची मत हे लोक फार गंभीरपणे घेतात. दुसऱ्यांच्या मतांनी जे प्रभावित होतात ते फार कमी प्रमाणात यशस्वी होतात. असं म्हटलं जात कि मत वा फुकटचे सल्ले देणं हा या जगातला बिनभांडवली धंदा आहे.

     काही लोकांना आपली मत देण्याची खोडच असते मग कुणी त्यांना ती विचारलेली असोत वा नसोत या मतांचा जे आपल्यावर प्रभाव पडून घेतात, ते आपल्या निर्णयाशी कधी ठाम राहू शकत नाहीत.' ऐकावे जनाचे, करावे मनाचे' हे आपल्या पूर्वजांनी उगाचच म्हटलं नाहीये.

     जर तुम्ही दुसऱ्याच्या टोमण्यांनी विचलित होत असाल, त्यांच्या मतांना अवास्तव महत्व देत असाल तर आयुष्यात तुम्ही तुमची मत बनवू शकणार नाही वा त्यांच्यावर तुमची श्रद्धा बसणार नाही .

     तुमचा स्वत:चा खाजगी ग्रुप बनवा, त्यात तुमच्या निर्णयाचा आदर करणारे, तुमच्याबद्दल सहानुभूती असलेले मोजकेच लोक असतील. तुम्ही त्यांच्याशी बोलून अडचणीतून मार्ग काढू शकता. ते तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करतील. पण आपले निर्णय आकाराला करणं टालळ पाहिजे. त्वरित निर्णय घेणारे, त्यांना चिकटून राहणारे, गरज भासलीच तर त्यात सुधारणा करणारे वा बदल करणारे लोक जीवनात यशस्वी होतात.

     याउलट निर्णय घ्यायलाच मुळात वेळ लावणारे आणि ते वारंवार बदलणारे लोक जीवनात अपयशी होतात. त्यांचा स्वत:च्या मतांवर विश्वास नसतो .ते आपल्या मतांवर ठाम राहू शकत नाहीत. आपल्या बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नकळत ते दुसऱ्यांना देऊन बसतात. 

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीखजीना.कॉम)
                   ---------------------------------------------

                                         उदाहरण-गोष्ट---
                               'ऐकावे जनाचे करावे मनाचे'---

      नेहाला आज IPS अधिकारी होताना बघून संगीताला स्वतःच्या निर्णयाचा अभिमान वाट्त होता....तिच्या सत्कार समारंभात नेहाने स्वतःची ओळख करून दिली...मी नेहा संगीता देशमुख..असेच नाव लिहायची ती लहान असल्यापासून...

     संगीता मात्र भूतकाळात हरवली, सोनोग्राफी करण्यासाठी नेले आणि लिंगपरिक्षा केली, मुलगी आहे समजल्यावर सुधीरने तिला गर्भ पाडून टाकण्यासाठी जबरदस्तीने दवाखान्यात आणले,पण तीच्या मधल्या आईने त्याला जुगारून पळ काढला....

     माहेरच्या लोकांनी पण हात वर केले,पती हाच परमेश्वर मानावा...असा सल्ला घरातल्या मोठ्या बाया देऊ लागल्या...

     पण कोणाचाही आधार न घेता तिने माहेरही सोडले...आणि नेहाला जन्म दिला...तिला योग्य तें संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभे केले..

     संगीताने खऱ्या अर्थाने 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण सार्थ केली...

लेखिका अनुजा  धारिया -शेठ
--------------------------

                    ( साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरीमिरर.कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.