"नवरात्रोत्सव"-दिवस नववा-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 01:10:26 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           "नवरात्रोत्सव"
                                            दिवस नववा
                                             रंग जांभळा
                                            लेख क्रमांक-१
                                          ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१५ .१०.२०२१ -शुक्रवार , नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज  देवी  विसर्जनाचा  दिवस  आहे .  मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र सणाच्या  नऊही  दिवसांची  इत्यंभूत  माहिती . (आजच्या दिवसाचा रंग जांभळा आहे.)

                          नवरात्र उत्सव----

     पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या शारदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याच मूळ नाव आहे 'ईष'. 'ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा 'ईष' म्हणजे अश्विन मास सुरू होतो. त्याच्या प्रारंभापासूनच सुरू होणा-या या नवरात्रोत्सवाच मूळ काय? हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी 'दुर्गम' नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा. त्याचा 'दुर्ग' म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचीच दुसरी नाव काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.

     हा विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक सणात वर्षांवर्षांची आशी नवीच भर पडत गेलेली दिसेल.

     दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरून शस्त्रे उतरवून विराटाच्यावतीने अरिजुनान कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.

     आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहान देशभर साजरा होतो. दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा तो सर्वाधिक महत्वाचा सण आहे.

     नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा पूर्ण प्रगत झाला. पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायडयाने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केल आहे.

      नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. ही पहिली रात्र असते. या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवता राहणार असतो. (प्राचीन अखंड अग्निहोत्र व्रताचच हे बाळप्रतीक होय.) हा घटस्थापनेचा दिवस.

     पुढे प्रत्येक दिवशी विपुल अशा झेंडूच्या किंवा तीळाच्या फुलांची एक एक चढत्याक्रमाची भरगच्च माळ या घटावर टांगली जाते. प्रत्येक दिवसानुसार तिला पहिली, दुसरी, तिसरी माळ म्हणतात. या काळात पाऊस पडलाच तर तो माळेत सापडला आता किमान नऊ दिवस तरी पूर्ण होईतोपर्यंत हटणार नाही. अशी बुजुर्ग चर्चा करतात. ती अनुभवसिध्द असते.

     नवरात्रात प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दुर्गासप्तशतीच्या एकएका पाठाचे सविध पठन केले जाते. काही घराण्यात त्यांची म्हणून आदिमायेच रूप मानलेली कुलदेवी असते. तिच्या स्तुतीचे पाठ असलेल्या त्या त्या घराणांच्या पोथ्या असतात. त्यांचेही पठन या काळात केले जाते.

     नवरात्राच्या नऊ दिवसात शेवटचे ८, ९ व १० हे दिवस फार महत्वाचे आहेत.

     विशेषत: ८ व्या दिवशी दुर्गेच्या नावाने कोरडा शिधा जोगवा मागण्याची पध्दत आजही काही घराण्यात चालू आहे. यासंदर्भात एक ऐतिहासिक व ठोस संदर्भ सदैव ध्यानात ठेण्यासारखा आहे. पुढे १६७४ साली रायगडावर बत्तीस मणी संपन्न सुवर्णी. सिंहासन उठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडावर व नंतर रायगडावरही स्वत:ला भवानीचा भक्त (भुत्या) मानून असा जोगवा मागितला होता.

     नवव्या दिवशी हवन होऊन दहाव्या दिवशी या उत्सवाच समापन होत. या दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणतात.ओदल्या नवव्या रात्रीला 'खंडेनवमीची माळ' म्हणतात. या दिवशी सर्व शस्त्रे पूजली जातात. काही मराठा घराण्यात बकरी पडतात.

     अलीकडे बदलत्या विज्ञानयुगानुसार दुर्गाभक्त व्यवसायाप्रमाण डॉक्टर असेल तर स्टेथॉस्कोप, शस्त्रक्रियेची अवजारे, विद्यार्थी असेल तर पेन-पुस्तकेही या दिवशी पूजतात. त्यावर झेंडूच्या माळा वाहतात.

     विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान 'सोन' म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली. पेशवाईत सरंजाम, नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ
झाली.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवरल्ड.कॉम)
                --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.