"नवरात्रोत्सव"-दिवस नववा-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, October 15, 2021, 01:23:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                           "नवरात्रोत्सव"
                                            दिवस नववा
                                             रंग जांभळा
                                           लेख क्रमांक-3
                                        -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-०७.१०.२०२१-गुरुवार पासून नवरात्रोत्सव सुरु झाला  आहे. आज दिनांक -१५ .१०.२०२१ -शुक्रवार , नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज  देवी  विसर्जनाचा  दिवस  आहे .मराठी कवितेतील माझ्या सर्व कवी-कवयित्री भाऊ-बहिणींस, नवरात्रीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. देवीस नमन करून मी माझ्या आजच्या लेखास सुरुवात करतो. आज जाणून घेऊया, नवरात्र दुर्गा विसर्जन - महत्त्व, मान्यता व परंपरा. (आजच्या दिवसाचा रंग जांभळा आहे.)

                     दुर्गा विसर्जन - महत्त्व, मान्यता व परंपरा----

     वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापति रावणाचा वध याच दिवशी केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुराचा वध याच दिवशी केला. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा केली जाते. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रोत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. यंदा रविवारी देशभरात साजरा केला जात असताना, सोमवारी दुर्गा विसर्जन करावे, असे सांगितले जात आहे. दुर्गा विसर्जनाचा मुहूर्त, महत्त्व, मान्यता व परंपरा यांविषयी जाणून घेऊया...

     आपल्याकडे काही सण हे अपरान्ह म्हणजेच दुपारनंतर साजरे केले जातात. रावणदहन हे सूर्यास्तानंतर करण्याची परंपरा प्रचलित आहे. सूर्यास्तापूर्वी रावणदहन करणे शास्त्रसंमत मानले जात नाही. 

     देशभरात काही ठिकाणी सकाळच्या वेळात दुर्गा विसर्जन केले जाते. तर काही ठिकाणी दुपारनंतर दुर्गा विसर्जन करण्याची परंपरा प्रचलित आहे.

              नवरात्र व्रताची सांगता व काही परंपरा----

     घटस्थापनेला दुर्गा देवीचे पूजन करताना विशेष व्रताचरण केले जाते. या व्रताची सांगता दुर्गा देवीच्या विसर्जनानंतर केली जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये विजयादशमीला दुर्गा विसर्जनापूर्वी सिंदू खेला नामक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी महिला एकत्रित येऊन एकमेकींना कुंकू (सिंदूर) लावतात आणि शुभेच्छा देतात. याच सिंदूर उत्सवाला सिंदूर खेला असे म्हटले जाते. यावेळी काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

--लेखक - देवेश फडके
  -------------------- 

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
              ----------------------------------------------


                                        रंग नवरात्रीचे
                                           कविता
                                      ---------------


शरदात  रंगतसे
उत्सव  हा  नवरात्रीचा
ओसंडून  वाहू  दे  आपल्या  जगतात
महापूर  नाविन्याचा  अन  आनंदाचा.


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता.कॉम)
                -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.10.2021-शुक्रवार.