"कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना, रस्त्यावर फेकलंय टोमॅटो, ढोबळी मिरच्यांना"

Started by Atul Kaviraje, October 16, 2021, 12:39:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                     विषय : ट्रक भरभरून फळभाज्या ओतल्या रस्त्यावर
                             वास्तव गंभीर व्यंगात्मक चारोळ्या
"कवडीमोल भाव मिळतोय फळभाज्यांना, रस्त्यावर फेकलंय टोमॅटो, ढोबळी मिरच्यांना"
                                        (भाग-2)                                               
--------------------------------------------------------------------------


(६)
अमाप पीक आलंय "फळभाज्यांचे" यंदा
खुश होता आमचा आज शेतकरी बंदा
पण त्याच्या साऱ्या मेहनतीचा झाला होता चुंदा,
गळ्याभोवती नकळत आवळून घेत होता तो फंदा.

(७)
खेळ आहे अति-लोकप्रिय परदेशात
पायाने "टोमॅटोची" सारे चिवडा-चिवडी करतात
आपला देशही उतरलाय या नाशवंत उत्सवात,
पायदळी तुडवले जाताहेत "टोमॅटो रस्त्यात".

(८)
हिरवी "भोपळी" विचारतेय खिन्न "टोमॅटोला"
तुझा लाल रंग आज  का पडलाय फिका ?
उत्तरला "टोमॅटो", होते माझे दिवस तेव्हा लाली-लाल,
आज मरण आलंय इथं "रस्त्यात" मला फुका !

(९)
"टोमॅटो" विचारी हिरव्यागार "भोपळी मिरचीला"
का तुला अति दुःखाचा उमाळा आला ?
"मिरची" वदली, तेव्हाचे हिरवेगार दिवस आठवले मला,
"भाव (दर)" मिळत होता तेव्हा घरोघरी मला !

(१०)
"भोपळी-मिरची", "टोमॅटो" "रस्त्यावर" चुपचाप पडून होते
आपले अंतिम क्षण ते मोजत होते
भले सुरीने तुकडे करा, चालेल आम्हाला,
पण असे "रस्त्यातले" मरण त्यांना नको होते.


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.10.2021-शनिवार.